Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा  

नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांची केंद्र सरकारकडे मागणी

अकोले ः अकोले तालुक्यात अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी ते जयंतीनिमित्त 18 जुलै ते 1 ऑगस्ट समरसता पंधरवड्यात अकोले शहरात शासकीय विश्रामगृह येथे अनुलोभच्य

के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  
वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन
हिंदी साहित्यामधून मानवतेची शिकवण : डॉ. देवेंद्र बहिरम

अकोले ः अकोले तालुक्यात अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी ते जयंतीनिमित्त 18 जुलै ते 1 ऑगस्ट समरसता पंधरवड्यात अकोले शहरात शासकीय विश्रामगृह येथे अनुलोभच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष स्थानी अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे हे होते. यावेळी खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन माधवराव तिटमे , ग्राहक पंचायतचे मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर, रा. स. प जिल्हा अध्यक्ष पांडुरंग पथवे, गणपत म्हसाळ, नवनाथ मोहिते, मीराबाई चांदणे, किरण गायकवाड, ज्ञानेश्‍वर साळवे, सागर गायकवाड, संगिता साळवे आदि उपस्थित होते.
        यावेळी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माधवराव तिटमे म्हणाले की शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिल्या. ते अकोल्यात 5ते 6 वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमत्ताने आले होते. अण्णाभाऊंच्या फकिरा,  सातार्‍याचा वाघ, माकडाचा माळ, बर्‍याच कादंबर्‍या प्रसिद्ध होत्या त्या वाचण्यात आल्या. अण्णाभाऊंच्या गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ सहभाग होता. त्यांचे कार्य सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांचे सहकारी मित्र शाहीर अमर शेख व गवाणकर यांनी तमाशा वगनाट्य केले. अण्णांच्या सहभागाने अनेक कलाकारांना व्यासपीठ प्राप्त झाले. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे म्हणाले शाहिर रत्न लोकशाहीर साठे हे थोर समाजसुधारक, लोककलावंत व लेखक होते. त्यांनी शाहिरीतून मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या शाहिरितून सर्वसामान्यांच्या न्यायासाठी वाचा फोडली. रशिया देशात त्यांनी शायरीचे काम केले. रशियाने त्यांना त्या कामात चांगली आर्थिक मदत केली. त्यामुळे रशियात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने पाठपुरावा करून रशियात मॉस्को येथे अण्णाभाऊ साठेंचा मोठा पुतळा उभारण्यात आला. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी वडजे यांनी केली. यावेळी पांडुरंग पथवे, मच्छिंद्र मंडलिक, गणपत म्हशाळ, किरण गायकवाड, सागर गायकवाड यांची मनोगते झाली. संगीता साळवे यांनी अण्णाभाऊ साठेंवर कविता सादर केली. सूत्रसंचालन अनुलोभचे भागजनसेवक रोहित चोथवे यांनी केले. उपस्थितांचे आभार ज्ञानेश्‍वर यांनी मानले.

COMMENTS