मुंबई ः उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आणखी एक मोठा नेता तपास संस्थांच्या रडावर आला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर
मुंबई ः उद्धव ठाकरे यांच्या गटाचा आणखी एक मोठा नेता तपास संस्थांच्या रडावर आला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले आहे. शिवसेना पक्षाच्या निधी संदर्भात शिवसेना शिंदे गटाने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेना पक्षाच्या खात्यातील पैसे काढल्या प्रकरणी चौकशी सुरू केली असून या संदर्भात आणि देसाई यांना आज चौकशीसाठी बोलावलं आहे. यासाठी अनिल देसाई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेमध्ये फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर झालेल्या निवडणूक आयोगातील सुनावणीत एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला होता. त्यामुळे घाईघाईने शिवसेना पक्ष खात्यातील 50 कोटी रुपये काढून घेतले, असा आरोप शिंदे गटाने केला आहे. 50 कोटी रुपये काढण्याच्या या आरोपावरून शिवसेनेच्या शिंदे गटाने तक्रार देखील दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने अनिल देसाई यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. वास्तविक उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरे गटातील अनेक नेते तपास संस्थांच्या रडावर आले होते. यामध्ये प्रामुख्याने रवींद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांचा समावेश आहे. आता यामध्ये अनिल देसाई यांचे देखील नाव समाविष्ट झाले आहे. या प्रकरणात अनिल देसाई यांची बाजू टिकते का? हे आता पहावे लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष कोणाचा असा वाद निवडणूक आयोगात रंगला होता. निवडणूक आयोगाने या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचाच खरी शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिला होता. तसेच शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांना दिले होते. एकनाथ शिंदे यांचा पक्षच खरी शिवसेना ठरल्यामुळे शिवसेना पक्षाच्या अधिकृत बँक खात्यात आसलेले पैसे अनिल देसाई यांनी तत्परतेने काढून घेतले होते. या खात्यातून अनिल देसाई यांनी 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. याच विरोधात त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे.
COMMENTS