नागपूर : देशाला स्वच्छतेचा मुलमंत्र देणारे निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या दहासुत्री कार्यक्रमाचा फोटोसह फलक मुंबई येथील मंत्रालयाच्या प्
नागपूर : देशाला स्वच्छतेचा मुलमंत्र देणारे निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या दहासुत्री कार्यक्रमाचा फोटोसह फलक मुंबई येथील मंत्रालयाच्या प्रवेश दारातून काढून टाकल्यामुळे धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये संंपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संविधान चौक नागपूर येथे धोबी समाज व गाडगेबाबांच्या विचारांशी बांधिलकी जपणार्या नागरिकांनी तीव्र धरणे, आंदोलन करून, निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला पुर्व मंत्री सुनिलभाऊ केदार यांनी भेट देऊन समजूत काढली.
श्री संत गाडगे बाबांचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे साहेब यांनी मुबई येथील मंत्रालयाच्या प्रवेश द्वारासमोर श्री संत गाडगे बाबा यांच्या दाहा सुत्री कार्यक्रमाचा फलक लावून आमचे सरकार गाडगे बाबाच्या दाहासुत्री कार्यक्रमानुसार काम करेल अशी घोषणा केली होती. मंत्रालयाच्या प्रवेश द्ववारावरील बाबाचा दहासुत्री कार्यक्रमाचा संदेशाचा फलक आमदार, मंत्री, अधिकारी व नागरीकांना गाडगे बाबाच्या कार्याची आठवन करुण देत असे त्यांना समाजहिताचे काम करण्याची उर्जा व प्रेरणा मिळत होती. महाराष्ट्रामध्ये सत्ते करीता हपापलेल्या देवेंद्र फडणविस व एकनाथ शिंदे सरकारने श्री संत गाडगे बाबा यांच्या फोटो सह दाहासुत्री कार्यक्रमाचा फलक काढूण च्याचा व त्यांच्या विचाराचा अपमाण केला या कृत्याला देशातील धोबी समाज व गाडगे बाबाला माणनारी मंडळी कधीही सहन करणार नाही. तरी देवेंद्र फडणविस व एकनाथ शिंदे सरकारने येत्या एक आठवड्याच्या आत मंत्रालयाच्या प्रवेश द्वारा समोर पुर्ववत श्री संत गाडगे बाबा चा दाहा सुत्री कार्यक्रमाचा फलक लावून गाडगे बाबांचा सन्मान करावा. अन्यथा महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये रस्त्यावर येऊन जनआंदोलनाचा इशारा संजय भिलकर, मनीष वानखेडे, दीपक सौदागर, यशवंत तेलंग, अरविंद मेश्राम, अरुण मोतीकर, राजू भोस्कर, रमेश काळे, वामनराव ठाकरे, रामकृष्ण कडुकर, राजाभाऊ चिलाटे, वंदना लोणकर, शुभांगी भोस्कर, राजू सेलुकर, मनोज कापसे, नितिन रामटेककर, निलेश सौदागर , विजय लोणारे, श्याम काटकर, राजेश वाघमारे, नारायनराव चिंचोलकर,दिलीप हिवरकर, पंकज चाफले, प्रकाश जुणघरे, जगदिश ताजणे, बंडुजी लोणारे यांनी दिला.
COMMENTS