Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये संतापाचा कडेलोट

6 हजार गुन्हे, 70 खून, पाच बलात्काराच्या घटना

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून धिंड काढल्याप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना फाशीची

पुनीत कुमारचा शेवटचा चित्रपट झाला प्रदर्शित | LokNews24
पारनेरला देणार मुळा धरणातून पाणी : उपमुख्यमंत्री पवारांची घोषणा
कोरोना लसीकरणासाठी सक्ती नको | DAINIK LOKMNTHAN

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून धिंड काढल्याप्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री एन.बीरेन सिंह यांनी म्हटले आहे. त्याचवेळी जमावाने एका आरोपीचे घर पेटवून देत आपला संताप व्यक्त केला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. आरोपीला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने या आरोपीचे घरच पेटवून दिले आहे. आरोपीच्या घराला आग लावून जमावाने निषेध नोंदवला आहे.
मणिपूर राज्यात 3 महिन्यात सुमारे 6 हजार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यभरात 70 हून अधिक लोकांचे खून झाले आहेत. तर, किमान 5 महिला लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत, असा दावा काही आमदारांनी केला आहे. याआधी सकाळी एका आरोपीला तर सायंकाळी एका आरोपीला अटक करण्यात आली. राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात 4 मे रोजी ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून काही लोक घेऊन जात असल्याचे दिसत आहे. त्यांच्यासोबत अश्‍लील वर्तन केले. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये निदर्शने सुरू झाली. हजारो लोकांनी काळे कपडे परिधान करून निदर्शने करत आरोपींच्या अटकेची मागणी केली. विशेष म्हणजे हेरोदासच्या घराला महिलांनीच आग लावली आहे. महिलांनीच त्याच्या घरावर चाल करत जाळपोळ करून आपला संताप व्यक्त केला आहे. या महिलांनी संतप्त भावनाही व्यक्त केल्या आहेत. या महिला मेतई समाजातील आहे. भलेही आरोपी आमच्या समाजातील असेल. पण अशा प्रकारच्या कृत्यांचे आम्ही कदापि समर्थन करणार नाही, असे या महिलांनी म्हटले आहे. ज्या चार लोकांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची नावे पोलिसांना कळल्याचे समजते. हेरोदासच्या शिवाय युमलेमबम जीबान, खुनडोंगबम अरुन आणि निनगोमबम टोम्बा असे या आरोपींचे नाव आहे. नोंगपोक येथील कमाई येथील हे रहिवासी असल्याचं सांगितलं जातं. हेरोदासला येरीपुक बाजारातून अटक केली आहे. तो मूळचा यैरिपोक बिष्णूनाहा येथील रहिवासी आहे. मात्र, वडिलांच्या निधानानंतर तो पेची येथे आजीकडे राहायला आला होता. तर जीबान स्वत:हून पोलिसांना शरण आला. अरुण नोंगपोक सेकमाई आणि टोम्बा यांना कोंगबा येथून गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी जातीय हिंसाचार सुरू झाल्यापासून 150 हून अधिक लोक ठार झाले आहेत आणि अनेक जखमी झाले आहेत, जेव्हा मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ डोंगराळ जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान जातिय हिंसाचर उसळला होता. त्यानंतर सतत मणिपूर धुमसतच आहे. मणिपूरच्या एकूण लोकसंख्येपैकी मेतई समुदायाची लोकसंख्या सुमारे 53 टक्के आहे आणि ते मुख्यतः इम्फाळ खोर्‍यात राहतात. तर या जमातीतील आदिवासी ज्यात नागा आणि कुकी यांचा समावेश आहे. ते 40 टक्के आहेत आणि ते बहुतेक डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.

कारवाई फक्त 657 जणांवर – आरक्षणाच्या मुद्द्यावरून उफाळलेला हिंसाचार रोखण्यात अपयश आले असून, आतापर्यंत किमान 6 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात 70 गुन्हे खुनाचे आहेत. इम्फाळ खोरे आणि लगतच्या डोंगराळ भागातून पोलिसांनी आतापर्यंत एकूण 657 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मणिपूर विधानसभेच्या दहा आमदारांनी महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांची आकडेवारी दिली आहे. राज्याच्या विविध भागांत आतापर्यंत किमान 5 महिलांची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक महिला बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत. मात्र, त्याचा तपशील आमदारांनी दिलेला नाही.

COMMENTS