Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणात सापडले वर्षांपूर्वीची हत्यारे

रत्नागिरी : कोकणात गेली दहा वर्षे कातळ खोदशिल्पांवर संशोधन सुरू आहे. पहिले कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रही रत्नागिरीत सुरू झाले. केंद्राच्या

बियाणे, खाते खरेदी करताना शेतक-यांनी दक्षता घ्यावी
आ.ससाने कडून ग्रामीण भागातील रस्त्याची पाहणी
 शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न

रत्नागिरी : कोकणात गेली दहा वर्षे कातळ खोदशिल्पांवर संशोधन सुरू आहे. पहिले कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रही रत्नागिरीत सुरू झाले. केंद्राच्या माध्यमातून चालू असलेल्या संशोधनात्मक कामातून मालवण, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये दगडी हत्यारे सापडली आहेत.मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसवी सन पूर्व ४० ते १० हजार या कालखंडातील ही हत्यारे असावीत. हा मानवाच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा पुरावा आहे. ही सर्व हत्यारे सर्वसामान्यांना पाहण्यासाठी कोकणातील कातळखोद चित्र आणि वारसा संशोधन केंद्रात उपलब्ध आहेत. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी आणि निसर्गयात्री संस्था यांच्यातर्फे संचलित कोकणातील कातळशिल्प संशोधन हा राष्ट्रीय प्रकल्प सुरू आहे. अभ्यास, संशोधन करताना सापडलेली दगडी हत्यारे ही कोकणातील मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण आहेत. तसेच दक्षिण कोकणात कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पुरावे आहेत.

सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूर-देसाई यांनी १० वर्षे अखंड मेहनतीतून कातळशिल्परुपी अनोखा वारसा जगासमोर आणला. यावर पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे व सहकार्याने, पुरातत्त्व अभ्यासक ऋत्विज आपटे आणि विविध ज्ञानशाखेतील तज्ज्ञ मंडळींच्या साथीने सखोल संशोधनात्मक काम चालू आहे. कातळशिल्प संशोधन चालू संशोधनातील एक मुख्य भाग म्हणजे कातळशिल्प परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण.या चालू असलेल्या संशोधनात्मक कामामध्ये ऋत्विज आपटे, सुधीर रिसबूड व धनंजय मराठे यांसह कातळशिल्प संशोधन प्रकल्पावर कार्यरत तरुण संशोधक दिव्यांश कुमार सिन्हा, रघुनाथ बोकिल, मधुसुदन राव, स्नेहा धबडगाव, रेणुका जोशी, तार्किक खातू यांचा समावेश आहे. १८ ते २० लाख वर्षांपूर्वी मानवाने दगडांचा वापर हत्यारे म्हणून सुरू केला. अनुभवानुसार त्याने दगडांना आकार देऊन सहज बाळगता येतील अशी उपयुक्त हत्यारे बनवली. त्याच्या साहाय्याने शिकार करणे, मेलेल्या जनावरांचे मांस साफ करणे, फाडणे इत्यादी गोष्टी करू लागला. काळानुरूप दगडी हत्याऱ्यांमध्ये झालेल्या बदलानुसार त्यांचे आकार, पद्धती, निर्मितीचे तंत्र यानुसार त्यांचे कालखंड ठरवले जातात. कोकणातील दगडी हत्यारे येथे मानवी वस्ती अंदाजे किती वर्षांपासून अस्तित्वात होती याचा पुरावा आहे. कोकणच्या प्रागैतिहासिक कालखंडाबाबत पुरातत्त्वीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पुरावे या रूपाने समोर आले आहेत.

COMMENTS