Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समर्पित नेतृत्वाचे उदाहरण म्हणजे नीलेश लंके; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे ; पारनेर येथे महाआरोग्य यज्ञ शिबिराचे उदघाटन

पारनेर : स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी तो जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित करण्याची भावना खासदार नीलेश लंके यांच्यात आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या नेत्यांचे उदाहरण म्हणजे नीलेश लंके होय. सरपंच पदापासून खासदारपदापर्यंतचा प्रवास करताना त्यांनी जनतेचा जो विश्वास संपादन केला, ते सर्वसाधारण काम नाही. लोकांप्रती प्रेमभावना, अथक परिश्रम आणि लोकाभिमुखता या गुणांमुळे पारनेरकरांनी त्यांना जपले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले.  खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नीलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपला मावळा संघटनेच्या वतीने पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित ‘महाआरोग्ययज्ञ’ आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  कार्यक्रमाला खासदार नीलेश लंके, खासदार भास्कर भगरे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किरण जाधव, डॉ. प्रकाश कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश लोंढे, प्रकाश लाळगे, स्किल हबच्या संचालिका अश्विनी शिंदे, आशिष शिंदे, संदीप वर्पे, राणीताई लंके, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, ज्ञानदेव लंके, मारुती रेपाळे, किसनराव रासकर, संभाजी रोहोकले, बाबाजी तरटे, सतीश भालेकर, अर्जुन भालेकर, कारभारी पोटघन मेजर, डॉ. बाळासाहेब कावरे, ॲड. राहुल झावरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेश सरडे, अमोल यादव आणि बाजीराव कारखिले यांनी केले.  यावेळी बोलताना माजी मंत्री टोपे म्हणाले की, खासदार नीलेश लंके यांना केवळ पारनेर किंवा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर मागणी आहे. कारण ते सामान्यांची भाषा बोलतात. काही जण पुस्तके वाचतात, तर नीलेश लंके यांनी माणसे वाचली आहेत. त्यांचा मित्रपरिवार मोठा असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मीयता आहे. नेत्यासाठी जीव ओवाळून टाकणारे सहकारी असणारे नेते फार कमी असतात. त्यात खा. लंके यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असेही टोपे यांनी नमूद केले. ‘उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा करा’ मी आरोग्यमंत्री असताना खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर पारनेर येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या; मात्र सरकार बदलल्याने काम पुढे गेले नाही. या रुग्णालयासाठी पुन्हा पाठपुरावा करावा. त्यासाठी आम्हीही पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही टोपे यांनी दिली. आरोग्य व शिक्षणावर विशेष भर  खासदार नीलेश लंके म्हणाले की, कोरोना काळात अनेक रुग्णसेवकांनी खांद्याला खांदा लावून काम केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश लोंढे यांनी २४ तास कोरोना सेंटरमध्ये उभे राहून सेवा दिली. अजितदादा पवार आणि शरद पवार यांना अभिप्रेत असे लोकाभिमुख उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत. आरोग्य आणि शिक्षण या दोन विषयांवर आमचे विशेष लक्ष आहे. एक वर्षात एक लाख चष्मे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शरद पवार यांच्या माध्यमातून साठ लाख रुपयांची रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून तिच्या माध्यमातून डोळे तपासणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पराभवाने खचायचे नाही, काम सुरूच ठेवायचे : अजित पवार
कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक
स्व.अजित दादांच्या निधनामुळे शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

पारनेर : स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी तो जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित करण्याची भावना खासदार नीलेश लंके यांच्यात आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या नेत्यांचे उदाहरण म्हणजे नीलेश लंके होय. सरपंच पदापासून खासदारपदापर्यंतचा प्रवास करताना त्यांनी जनतेचा जो विश्वास संपादन केला, ते सर्वसाधारण काम नाही. लोकांप्रती प्रेमभावना, अथक परिश्रम आणि लोकाभिमुखता या गुणांमुळे पारनेरकरांनी त्यांना जपले आहे, असे गौरवोद्गार राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

 खासदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नीलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपला मावळा संघटनेच्या वतीने पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित ‘महाआरोग्ययज्ञ’ आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

 कार्यक्रमाला खासदार नीलेश लंके, खासदार भास्कर भगरे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक किरण जाधव, डॉ. प्रकाश कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश लोंढे, प्रकाश लाळगे, स्किल हबच्या संचालिका अश्विनी शिंदे, आशिष शिंदे, संदीप वर्पे, राणीताई लंके, सुवर्णा धाडगे, पुनम मुंगसे, नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे, उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, ज्ञानदेव लंके, मारुती रेपाळे, किसनराव रासकर, संभाजी रोहोकले, बाबाजी तरटे, सतीश भालेकर, अर्जुन भालेकर, कारभारी पोटघन मेजर, डॉ. बाळासाहेब कावरे, ॲड. राहुल झावरे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जितेश सरडे, अमोल यादव आणि बाजीराव कारखिले यांनी केले.

 यावेळी बोलताना माजी मंत्री टोपे म्हणाले की, खासदार नीलेश लंके यांना केवळ पारनेर किंवा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर मागणी आहे. कारण ते सामान्यांची भाषा बोलतात. काही जण पुस्तके वाचतात, तर नीलेश लंके यांनी माणसे वाचली आहेत. त्यांचा मित्रपरिवार मोठा असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मीयता आहे. नेत्यासाठी जीव ओवाळून टाकणारे सहकारी असणारे नेते फार कमी असतात. त्यात खा. लंके यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल, असेही टोपे यांनी नमूद केले.

‘उपजिल्हा रुग्णालयासाठी पाठपुरावा करा’

मी आरोग्यमंत्री असताना खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर पारनेर येथे उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी दिली होती. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या; मात्र सरकार बदलल्याने काम पुढे गेले नाही. या रुग्णालयासाठी पुन्हा पाठपुरावा करावा. त्यासाठी आम्हीही पूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही टोपे यांनी दिली.

आरोग्य व शिक्षणावर विशेष भर 

खासदार नीलेश लंके म्हणाले की, कोरोना काळात अनेक रुग्णसेवकांनी खांद्याला खांदा लावून काम केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश लोंढे यांनी २४ तास कोरोना सेंटरमध्ये उभे राहून सेवा दिली. अजितदादा पवार आणि शरद पवार यांना अभिप्रेत असे लोकाभिमुख उपक्रम आम्ही हाती घेतले आहेत. आरोग्य आणि शिक्षण या दोन विषयांवर आमचे विशेष लक्ष आहे. एक वर्षात एक लाख चष्मे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शरद पवार यांच्या माध्यमातून साठ लाख रुपयांची रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून तिच्या माध्यमातून डोळे तपासणीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

COMMENTS