Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांच्या बंडाला पूर्णविराम

राष्ट्रवादी काँगे्रसमध्येच राहणार असल्याचे स्पष्टीकरण

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेवून, भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्या

माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.
शिरूरमधून आमचाच उमेदवार निवडून आणू
ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणार्‍यांना बसणार चाप

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार आपल्या 40 आमदारांना घेवून, भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र सकाळीच राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवारांच्या बंडाचे वृत्त फेटाळले होते, त्यानंतर दुपारी अजित पवारांनी देखील या सर्व वावडया असून, बंडाचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले आहे. अजित पवारांनी जरी बंडाचे दावे फेटाळून लावले असले तरी, पडद्याआडून मोठ्या घडामोडी घडतांना दिसून येत आहे.
पत्रकार परिषदेत बोलतांना अजित पवार म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना काही अर्थ नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले गेले. आपण जे वेगवेगळ्या आमदारांची भेट झाल्याचे दाखवत आहात, ते सर्व विविध कामांनिमित्त आले होते. त्यामुळे या चर्चांना काही अर्थ नाही. या बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. आम्ही सर्व राष्ट्रवादीतच राहणार आहोत. पक्षाने अनेक चढउतार पाहिलेले आहेत. आम्ही राज्यातील प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित केले आहे. महागाई असेल, कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक असेल किंवा अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान या प्रश्‍नांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तुम्ही दाखवत असलेल्या बातम्यांमध्ये यत्किंचितही तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत. कोणी काय मत व्यक्त करावे, हा त्या-त्या राजकीय पक्षाचा अधिकार आहे. आमदार मंत्रालय कामासाठी येतात. आमदार नेहमीच्या पद्धतीने भेटायला येत आहेत. त्यात वेगळा अर्थ काढू नका. अजित पवार पुढे म्हणाले की, बाबांनो काळी काळजी करू नका. शरद पवारांच्या मार्गदर्शन, नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आजवर अनेक चढउतार आले. मात्र, बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. महत्त्वाचे प्रश्‍नावरून लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न. बेकारी, अवकाळी पाऊस, महागाई, नोकर भरती होत नाही. खरेदी केंद्रे अनेक ठिकाणी बंद पडत आहेत. ही केंद्रे सुरू करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक जण उष्माघाताने दगावले, अनेकांवर उपचार सुरू होते. मी त्या सर्वांची भेट घेतली. मोठ्या प्रमाणावर श्रीसदस्य आले, आदल्या दिवशीही अनेक जण आलेले आपल्याला दिसले असतील. यात आम्हाला कुठल्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर 13-14 कोटी रुपये खर्च केला जातो. मग एवढा खर्च केला तर मंडप टाकायला काय अडचण होती? याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे देखील अजित पवारांनी यावेळी सांगितले.

अजित पवारांकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ः बावनकुळे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. त्यांना वारंवार आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू नका, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते मुंबईत बोलत होते. अजित पवारांकडून भाजपकडे कुठलाही अधिकृत प्रस्ताव नाही. अजित दादांच्या प्रतिष्ठेला डॅमेज करायचा विषय नाही. मात्र, एखादी घटना गतकाळात घडली असेल. ती कशामुळे घडली, तर आमच्याशी विश्‍वासघात झाला. त्यामुळे कदाचित या चर्चा सुरू असाव्या असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS