Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औसारोडवर झाड तोडण्याचा प्रयत्न; काळ्या मुखपट्टी बांधून ग्रीन लातूर टीमकडून निषेध

लातूर प्रतिनिधी - शहरातील औसा रोडवर आदर्श कॉलनीजवळ गुरुवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी एका मोठ्या झाडाच्या सर्व फांद्या छाटून झाड तोडण्याचा प्रयत्न

गावाच्या विकासासाठी धार्मिक ऐक्य महत्त्वाचे : आ. काशीनाथ दाते
रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण काळाची गरज
अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक

लातूर प्रतिनिधी – शहरातील औसा रोडवर आदर्श कॉलनीजवळ गुरुवारी पहाटे अज्ञात व्यक्तींनी एका मोठ्या झाडाच्या सर्व फांद्या छाटून झाड तोडण्याचा प्रयत्न केला. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त, संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन वृक्षतोड करणार्‍यांवर कारवाईची मागणी केली. तसेच काळ्या मुखपट्टी बांधून वृक्षतोडीचा निषेध व्यक्त केला.
शहरामध्ये ठिकठिकाणी झाड तोडणे, झाडांच्या खाली केमिकल टाकून झाडे जाळणे, झाडांच्या फांद्या मोडणे, झाडांच्या खाली कचरा जाळणे अशा घटना वारंवार होत आहेत. टीमचे सदस्य डॉ.भास्कर बोरगावकर यांनी वारंवार चुका करणार्‍या लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. झाडाखाली सावलीमध्ये गाडी लावू दिली नाही, म्हणून दोन-तीन अज्ञात व्यक्तींनी रागाच्या भरात झाडांच्या सर्व फांद्या तोडल्या अशी चर्चा सुरू होती. झाड तोडण्याच्या अगोदर, फांद्या मोडण्याच्या अगोदर शेजारील सीसीटीव्ही कॅमेरा दिशा बदलण्यात आली असल्याचेही ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी सांगितले. आंदोलन टीमचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS