Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात

१ ठार, ३७ जखमी

पंढरपूर प्रतिनिधी - मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा येथे देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोघांना गाडीने चिरडले .
चार खेळाडूंचा अपघातात मृत्यू
जामखेड-आष्टी रोडवरील भीषण अपघातात 5 जण ठार

पंढरपूर प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा येथे देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले. तर २९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज बुधवारी सकाळी ६ वाजता घडली. भारत यात्रेसाठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूर कडे निघाली होती दरम्यान फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली ट्रॅव्हल बस अतिवेगाने होती तसेच ड्रायव्हर मोबाईल वर बोलत असल्याचे जखमी भाविकांने यावेळी सांगितले घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ भेट जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक दीपक धोत्रे यांनी जखमींवर उपचार केले एकजण मयत झाला असून आठ जणांना पुढील उपचारासाठी इतर दवाखान्यात रेफर करण्यात आहे २९ जण स्टेबल असल्याची माहिती दीपक धोत्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

COMMENTS