Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उदंरखेल साठवण तलावात बेवारस मृतदेह आढळला

आष्टी प्रतिनिधी - आष्टी तालुक्यातील उदंरखेल येथे असणारा साठवण तलाव (कढाणी) मध्ये रोडच्या एका बाजुला एक बेवारस मृतदेह आढळुन आल्याचा प्रकार आज सक

 छत्रपती शाहू अकॅडमीची साताऱ्यात पर्यावरण पूरक रॅली
“४९८ अ”वर पुनर्विचार करण्याची शिफारस!
पुणे महापालिका सरसकट लसीकरण करण्यास तयार

आष्टी प्रतिनिधी – आष्टी तालुक्यातील उदंरखेल येथे असणारा साठवण तलाव (कढाणी) मध्ये रोडच्या एका बाजुला एक बेवारस मृतदेह आढळुन आल्याचा प्रकार आज सकाळी 10वाजता उघडकीस आला शाळेतील विद्यार्थ्यांना मृतदेह दिसला असता त्यांनी हा दिसलेला सारा प्रकार आपल्या गावातील तरुण व्यक्तींना सांगितला व गावकरी सारे जमून लगेच जवळ असलेले अंभोरा पोलीस स्टेशन यांना कळवले असता अंभोरा पोलीस स्टेशनचे   एपीआय बेंबरे साहेब व संपूर्ण स्टाफ घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेतला या अज्ञात मृतदेह शरीराची झीज झाल्या कारणाने पंचनाम्याला अडथळा आला पंचनामा केल्यानंतर हा मृतदेह पुरुषाचा आहे असे निदर्शनास आले मृत्ताचे वय 60ते 65 च्या दरम्यान असु शकते असा अंदाज बेंबरे साहेबांनी सांगितला पंचनामा करताना स्वतः अंभोरा पोलिस ठाण्याचे एपीआय बेंबरे साहेब, उपनिरीक्षक देशमाने सर,पो.कॉ.केदार,पो.कॉ.शिरसाठ, पोलिस नाईक गडकर हे पंचनामा घटनास्थळी उपस्थित होते  हा मृतदेह आंबेजोगाई शवविच्छेदन साठी हलवण्यात येणार असल्याचे बेंबरे साहेबांनी सांगितले.

COMMENTS