नवी दिल्ली प्रतिनिधी - दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी घातली असूनही लोक फटाके फोडणं सोडत नाहीत. दिवाळीला अजून वेळ असला तरी फटाके फोडण्याची प्
नवी दिल्ली प्रतिनिधी – दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी घातली असूनही लोक फटाके फोडणं सोडत नाहीत. दिवाळीला अजून वेळ असला तरी फटाके फोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी तर वाढतेच, पण त्यामुळे लोक गंभीर जखमी होण्याची शक्यताही वाढते. आता दिल्लीतील शास्त्री पार्कमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे फटाके फोडल्याने एका 11 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर कोणीतरी फटाके फोडल्याने मुलाच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, ज्या रस्त्यावरून तो जात होता, त्या रस्त्यावर कोणीतरी फटाके पेटवल्याची मुलाला कल्पनाही नव्हती. लहान मुलगा फटाक्याजवळून जात असताना त्याचा स्फोट झाला. या घटनेनंतर मुलगा वेदनेनं डोळे मिटून वेदनेनं तडफडताना दिसला. मुलासोबत झालेल्या या अपघातानंतर एक मुलगा त्याच्या मदतीसाठी त्याच्या जवळ जाताना दिसत आहे.फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, ही घटना 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. फटाक्यामुळे मुलाच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली. या घटनेच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 286 आणि 337 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितलं की, शास्त्री पार्क येथील रहिवासी असलेल्या या मुलाच्या बाबतीत मेडिको लीगल केस म्हणजेच एमएलसी ऑल इंडिया मेडिकल हॉस्पिटलकडून प्राप्त झाली होती. त्यांनंतर एखाद्याचा जीव धोक्यात घालून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.मुलाच्या डोळ्यावर उपचार केल्यानंतर 17 ऑक्टोबरला त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दिल्लीत फटाक्यांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वितरण आणि फोडण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करण्यात आलं आहे.
COMMENTS