Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनीचा दहावीचा निकाल 100 टक्के

संगमनेर ः आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असणार्‍या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील अ

सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास भरभराट होईल राज्यपाल बागडे
अकोल्यात आज सातबारा फेरफार अदालत अभियान
मुक्या प्राण्यांसाठी नगरमध्ये होणार 100 पाणवठे

संगमनेर ः आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असणार्‍या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा इयत्ता दहावीचा  निकाल 100 टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड यांनी दिली आहे.
विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे व विश्‍वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून इयत्ता दहावीच्या  परीक्षेसाठी संस्थेतून 139 विद्यार्थी बसले होते यापैकी सर्व 139  विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल 100 टक्के लागला आहे.
90 टक्क्यांच्या पुढे 5 तर 75 % च्या पुढे 43 विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत. यामध्ये प्रथम पार्थ संतोष काब्रा -93.80 टक्के, द्वितीय वेदिका संतोष गुंजाळ – 93.20 %, तृतीय संचित राजेंद्र मुसळे- 92.80 %, चतुर्थ  प्रसन्ना सागर दिंडे-91.00 % तर श्रावणी सचिन हासे- 90.60 % मिळवून पाचवी आली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ सुधीर तांबे, विश्‍वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. जे बी गुरव, प्रा. व्ही.बी धुमाळ, प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड,  श्रीमती शोभा हजारे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS