Homeताज्या बातम्यादेश

अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आश्रयाला ?

गुप्तचर यंत्रणांच्या हाती महत्वाचे धागेदोरे

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी पंजाबसह, जम्मू-

संजय राऊत वात्रट तोंडाचे – आ. संजय गायकवाड   
पढेगावच्या शिंदे दाम्पत्याचे तीन तासाच्या अंतराने निधन
तालमीत कुस्तीचा सराव करत असताना पैलवानाचा दुर्देवी मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी पंजाबसह, जम्मू-काश्मीर उत्तराखंडसह विविध राज्यात त्याचा शोध घेणे सुरु आहे. त्याचबरोबर अमृतपाल सिंग महाराष्ट्रात आश्रयाला आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अमृतपाल सिंग प्रकरणी महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर असून, नांदेड पोलिसांना सुरक्षा यंत्रणांच्या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नांदेडमध्ये येणार्‍यांवर पोलिसांची कडक नजर असणार आहे. अमृतपाल सिंग फरार आहे. पंजाब पोलीस त्याच्या मागावर आहे. अमृतपाल दुसर्‍या राज्यात जाऊ शकतो. त्यामुळे देशभरातील पोलिस देखील सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलिस अलर्ट मोडवर आहे. याप्रकरणी काही जिल्ह्यांना निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड शहरात पंजाबमधून येणार्‍यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी पंजाबमध्ये काही खलिस्तानी अतिरेकी पकडले गेले होते. त्यामुळे अमृतपाल आणि त्याचे समर्थक नांदेडला येऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अलर्ट राहीर करण्यात आला आहे. बाहेरून जे लोक नांदेडमध्ये येतात त्यांच्यावर पोलिस लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, आतंकवादी हरविंदर सिंह रिंदा याच्यासोबत अमृतपालचे संबंध आहेत. पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत रिंदाचे तगडे  नेटवर्क आहे. अमृतपालने अशा प्रसंगासाठीच रिंदासोबत संबंध अबाधित ठेवल्याची माहिती आहे. खलिस्तानची मागणी करणारा पंजाबचा कट्टरपंथी अमृतपाल महाराष्ट्रातील ड्रग्स पेडलर्सच्या आश्रयाला आल्याची माहिती आहे. अमृतपालचे संबंध, त्याचे नेटवर्क आणि इतर माध्यमांमधून गुप्तचर यंत्रणांना लिंक मिळत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आयएसआय हँडलरच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या इशार्‍यावर देशात ड्रग्सचा धंदा करणार्‍या लोकांच्या आश्रयाला अमृतपाल असल्याची माहिती मिळतेय. सध्या गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र, नांदेड ते मुंबईपर्यंत आपली यंत्रणा कामाला लावली आहे. पाकिस्तानमधून सूत्र हलवणार्‍या आणि देशात ड्रग्स सप्लाय करणार्‍या हरिवंदर सिंह रिंदा याची अमृतपालला मदत होत असल्याची माहिती आहे. या माहितीला पुष्टी मिळालेली नाही. मात्र तो पंजाबमधून महाराष्ट्राकडे गेल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.

अमृतपाल सिंगचे सात लुक पोलिसांकडून जाहीर – ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग सध्या फरार आहे. पंजाब पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. 80 हजारांचा पोलिस फौजफाटा असूनही अमृतपाल सिंग तुमच्या हातून निसटलाच कसा? असा जाबही पतियाला उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला विचारला आहे. त्यामुळे एकूणच अमृतपाल सिंग हे नाव सध्या पोलिस यंत्रणेपासून गुप्तहेर खात्यापर्यंत सगळ्यांच्याच हिटलिस्टवर आहे. मात्र, एवढे असूनही अमृतपाल सिंग सापडत नसल्याचे कारण त्याच्या पेहेरावात दडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याचे सात लूक जाहीर केले आहे.

COMMENTS