Homeताज्या बातम्यादेश

अमृतपाल सिंग लवकरच शरण येऊ शकतो

14 एप्रिलपर्यंत जवान आणि अधिकार्‍यांच्या सुट्या रद्द

अमृतसर/प्रतिनिधी ः वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंग भटिंडा येथील तलवंडी साबो येथे आत्मसमर्पण करू शकतो. अकाल तख्तचे जथेदार हरप्रीत सिंह यांनी

मतदार जनजागृती अभियानास विद्यार्थी, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रद्द कायद्यांतर्गत पोलिसांकडून गुन्हे दाखल
शिर्डी लोकसभा मतदारसंघात 22  नामनिर्देशन अर्ज वैध

अमृतसर/प्रतिनिधी ः वारिस पंजाब दे चा प्रमुख अमृतपाल सिंग भटिंडा येथील तलवंडी साबो येथे आत्मसमर्पण करू शकतो. अकाल तख्तचे जथेदार हरप्रीत सिंह यांनी तलवंडी साबो येथील तख्त श्री दमदमा साहिब येथे विशेष बैठक बोलावली आहे. इथेच तो पोहोचेल आणि नंतर शरणागती पत्करेल अशी चर्चा आहे.
अमृतपाल हा गेल्या 21 दिवसांपासून फरार आहे. दुसरीकडे, पंजाब पोलिसांनी तलवंडी साबोमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. पंजाब पोलिसांच्या 14 एप्रिलपर्यंतच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या पोलीस कर्मचार्‍यांनी रजा घेतली आहे किंवा रजेवर आहेत त्यांचीही रजा रद्द करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांच्या या निर्णयाचा संबंध अमृतपाल सिंग यांच्या तलवंडी साबोमध्ये सरबत खालसा बोलावण्याच्या मागणीशी जोडला जात आहे. सरबत खालसा किंवा अमृतपालच्या आवाहनावर गर्दी जमवण्याच्या मुद्द्यावर एडीजीपी एसपीएस परमार म्हणाले की त्यांची सभा मर्यादित लोकांची आहे. कार्यक्रमाबाबत पोलिसांचाही सतर्कता आहे. सध्या आम्ही सामान्य सुरक्षा सुधारण्यासाठी पूर्ण कारवाई करत आहोत. 13 एप्रिल रोजी तलवंडी साबो येथे बैसाखी जत्रेमुळे मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. 18 मार्च रोजी फरार झाल्यानंतर अमृतपालने 2 व्हिडिओ जारी केले. ज्यामध्ये अकाल तख्तच्या जथेदारांना 14 एप्रिलला बैसाखीच्या सणावर तलवंडी साबो येथे सरबत खालसा बोलवण्याचे आवाहन करण्यात आले होते. 18 मार्च रोजी फरार झाल्यानंतर अमृतपालने 2 व्हिडिओ जारी केले. ज्यामध्ये अकाल तख्तच्या जथेदारांना 14 एप्रिलला बैसाखीच्या सणावर तलवंडी साबो येथे सरबत खालसा बोलवण्याचे आवाहन करण्यात आले होते. अमृतपाल पंजाबमध्ये आल्याचे वृत्त कळताच पंजाब पोलीस सतर्क झाले आहेत. 27 मार्च रोजी अमृतपाल सिंग आणि त्याचा साथीदार पपलप्रीत होशियारपूरला पोहोचल्यावर त्यांनी गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला. यादरम्यान गुरुद्वारातील एक प्रतिष्ठित व्यक्ती अमृतसरमध्ये आली होती आणि त्यांनी जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांची भेट घेतली होती. जथेदार ज्ञानी याला दुजोरा देत नाहीत. त्या व्यक्तीने जथेदार ज्ञानी यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करण्यास सांगितले असल्याचा अंदाज आहे. अमृतपालने याआधीच होशियारपूर येथील गुरुद्वाराला भेट दिली होती जिथे अमृतपाल मुक्कामी होता

COMMENTS