Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात अमृत कलशाच्या शोभा यात्रा

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशातील राबवण्यात येणाऱ्या माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येत आ

शेवगाव दंगलप्रकरणी सूड भावनेतून गुन्हे दाखल
ED शिवाय देशात सध्या काहीच चालत नाही – शरद पवार |
पुष्पा चित्रपटामुळेच केला मी हा गुन्हा, मै झुकेगा नही साला

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण देशातील राबवण्यात येणाऱ्या माझी माती माझा देश अभियान राबवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात देखील माझी माती माझा देश अभियानांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अमृत कलश यात्रा ही उत्साहात काढण्यात यावी याबाबतच्या सूचना ग्रामपंचायत विभागास दिल्या होत्या त्यानुषंगाने ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी वर्षा फडोळ यांनी सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांना अमृत कलश यात्रा काढण्याबाबत मार्गदर्शन केले, त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यातील १३८८ ग्रामपंचायतींमध्ये अमृत कलश यात्रा या काढण्यात येत आहेत.

अमृत कलश अभियानांतर्गत प्रत्येक गावात एक अमृत कलश तयार करण्यात येत आहे, या अमृत कलशात प्रत्येक घरातून माती गोळा करण्यात येत आहे, ज्या कुटुंबांकडे शेती आहे अशा कुटुंबातील सदस्यांनी माती व ज्या कुटुंबांकडे शेती नाही अशा कुटुंबातील सदस्यांनी १ चिमुटभर तांदूळ मातीच्या कालशामध्ये जमा करण्यात येत आहे. अशा पद्धतीने प्रत्येक गावातून एक कलश तयार करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात १ सप्टेंबर पासून या अभियानास सुरवात झाली असुन आजपर्यंत ९५७ ग्रामपंचायतींचे अमृत कलश तयार करण्यात आले आहेत. इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी देखील त्र्यंबकेश्वर येथे अभियानात सहभाग नोंदवून अमृत कलशात माती टाकून सर्व ग्रामपंचायतींनी अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन केले, नाशिक जिल्ह्यात अमृत कलशांच्या शोभायात्रा देखील अनोख्या पद्धतीने काढण्यात येत असून गावातील अबालवृद्ध या अमृत कलश यात्रेत सहभागी होते आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा देखील या अभियानात सहभाग असून नाशिक जिल्ह्यातील शाळांमधून अमृत कलश यात्रा या काढण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी या गावातील अमृत कलश यात्रा ही पारंपारिक संबळ वाद्याच्या मिरवणुकीतून काढण्यात आली अशाच पद्धती नाशिक जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीतून कलश यात्रा काढण्यात येत आहे. दि.१ ऑक्टोबर पर्यंत तालुकास्तरावर या कलशांचे संकलन तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे व सर्व गावांमधून गोळा करण्यात आलेल्या कलशातील माती एकत्रित करून तालुका स्तरावर प्रातिनिधिक कलश तयार करण्यात येणार आहे.

COMMENTS