Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामान्य कुटुंबातील अमोल कानडेने मिळवली अमेरिकेत नोकरी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले तब्बल 72 लाखांचे पॅकेज

कोपरगाव तालुका ः कोपरगाव येथील रहिवाशी असणारा व संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी अमोल जगणराव कानडे याने 72 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळवत अमेर

 सरकारने आरक्षणावर निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन
कोरोनामुळं मृत झालेल्यांना भरपाई अशक्य l DAINIK LOKMNTHAN
आविष्कार स्पर्धेत आव्हाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड

कोपरगाव तालुका ः कोपरगाव येथील रहिवाशी असणारा व संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी अमोल जगणराव कानडे याने 72 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळवत अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न साकार केले आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करून खडतर प्रयत्न करुन अडीच वर्षांपूर्वी अमोलने बेंगलोर येथील डब्लू एस पी कन्सल्टंट या कंपनीत नोकरी मिळवली हार्ड वर्कींगमुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने अमोल कानडेची अमेरिकेत कॅनेसुस सिटी मिससौरी करीता निवड केली असुन अमोल अमेरिकेत रवाना झाला आहे.
      अमोल कानडे हा अत्यंत सामान्य गरीब कुटुंबातील असुन कोपरगाव येथील मेनरोडचे अतिक्रमण काढल्याने त्याच्या वडिलांचे दुकान अतिक्रमनात गेल्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती त्यावर मात करीत वडिलांनी संघर्ष केला व मुलांना शिकवले. अमोलचे वडील जगन दादा कानडे हे काँग्रेस कार्यालया समोर फूटपाथवर रस्त्याच्या कडेला चप्पल विक्रीसाठी दुकान लावतात व रात्री सोमय्या कॉलेज येथे वॉचमन म्हणुन आजही काम करतात त्यांचे दोन मुले व एक मुलगी व पत्नी सुनिता कानडे असा परिवार असुन पती पत्नी दोघांनीही कष्ट करून तीनही मुलांना अभियंता केले आहे हे कौतुकास्पद आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे नुकताच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अमोल व त्याचे आई वडील  यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल कानडे याने अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगत गुरुजनांचे मार्गदर्शन व कुटुंबाची साथ असल्याचे सांगत समाज बांधवानी यशाची दखल घेऊन सत्कार केल्या बद्दल  विशेष आभार मानून कानडे कुटुंबाचे व कोपरगावचे नाव उज्वल करून दाखविण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात संजीवनी सैनिकी स्कूलचे निवृत्त प्राचार्य गायकवाड अध्यक्षस्थानी होते वारीचे माजी पंचायत समिती सदस्य चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे,सामाजिक कार्यकर्ते वसंतराव थोरात अमोलचे मोठे काका सोमय्या साकरवाडीचे कामगार नेते  एम डी कानडे, निवृत्त तहसीलदार डी आर दुशिंग, प्राचार्य माधवराव पोटेसर, भाऊसाहेब कानडे, संतोष कानडे, मगर यांनी विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी रंगनाथ कानडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहराध्यक्ष गणेश कानडे, राकेश धाकतोडे, संकेत कानडे, आकाश कानडे, जगणराव कानडे, चौधरी चंद्रकला कानडे, सुनिता कानडे मीरा दुशिंग यांचे सह कानडे परिवारातील नातेवाईक समाज बांधव ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS