सामाजिक भावनेतून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा अमोल गर्जे यांनी स्वखर्चाने बुजवला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक भावनेतून राष्ट्रीय महामार्गावरील खड्डा अमोल गर्जे यांनी स्वखर्चाने बुजवला

पाथर्डी/प्रतिनिधी : पाथर्डी शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माळी बाभुळगाव शिवारात असलेल्या शिक्षक कॉलनी येथे मोठा खड्डा पडल्याने प्रवाशांचे हा

कृषी यांत्रिकीकरण योजनेत कोपरगाव तालुका जिल्ह्यात अव्वल
कोठला परिसरात गोवंशीय मांसासह एकास अटक
गावठी कट्टे झाले प्रतिष्ठेचे… धमक्यांच्या उद्योगाला येते धार…

पाथर्डी/प्रतिनिधी : पाथर्डी शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माळी बाभुळगाव शिवारात असलेल्या शिक्षक कॉलनी येथे मोठा खड्डा पडल्याने प्रवाशांचे हाल व वाहनांचे नुकसान होत असल्याने भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी शनिवारी रात्री स्वखर्चातून तिथे मुरूम टाकून तो खड्डा बुजवत प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले. यावेळी त्यांनी बोलताना म्हटले की,राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षापासून चालू आहे.परंतु अद्याप ते पूर्ण झाले नाही. ठेकेदाराचे नियोजन नसल्यामुळे या रोडवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.तर काही ठिकाणचे काम अपुरे काम झाले आहे. अपुऱ्या कामातही रोडची दशा व्यवस्थित नसल्याने अपघात होऊन अनेकांचे हाल होत आहे तर काहींचे जीव गेले आहेत.तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत.अशा परिस्थितीत ठेकेदार शासकीय अधिकारी कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. तरी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून या रस्ताचा प्रश्नी मार्गी लावण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

COMMENTS