Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमित तोष्णीवाल सीए परीक्षेत उत्तीर्ण

तलवाडा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी असलेले सुनिलकुमार कचरूलाल तोष्णीवाल यांचे चिरंजीव अमित तोष्णीवाल याने चार्टर्ड अकाउंट

हुतात्मा दिनानिमित्त राज्यपालांची मणिभवनला भेट
बेरोजगारांना रोजगाराची सुवर्णसंधी… नावनोंदणी करण्याची गरज
कदमवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबास शिवसमर्थ संस्थेची आर्थिक मदत

तलवाडा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी असलेले सुनिलकुमार कचरूलाल तोष्णीवाल यांचे चिरंजीव अमित तोष्णीवाल याने चार्टर्ड अकाउंटेंट (सीए) अंतिम परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तो सीए अंतिम परिक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे आई-वडील, चुलते-काकी, आजी-आजोबा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अतिशय कठीण असलेल्या सीए परीक्षेत ग्रामीण भागातील या मुलाने आपल्या आई-वडीलांचे व घरातील नातेवाईक यांचे स्वप्न साकार केले असून तलवाडा गावाचे नाव देखील उज्ज्वल करून दाखविले आहे. त्याने मिळविलेल्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा केला आहे.

COMMENTS