Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमेय दरेकर याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला

पाण्याच्या टाकीवर गर्लफ्रेंड बसली होती मात्र रागावलेल्या बॉयफ्रेंडने दिले ढकलून

मुंबई प्रतिनिधी  - दिल्ली येथील श्रद्धा हत्याकाडानंतर संपूर्ण देश हदारलेला असताना मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीपीपो कर्मचारी असलेल्या

पाचगणी बसस्थानकात पुन्हा लाल परी प्रवाशांच्या सेवेत रुजू
पिंपरी-चिंचवडमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार | LOKNews24
कसब्यात 45 तर, चिंचवडमध्ये 41 टक्के मतदान

मुंबई प्रतिनिधी  – दिल्ली येथील श्रद्धा हत्याकाडानंतर संपूर्ण देश हदारलेला असताना मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीपीपो कर्मचारी असलेल्या मैत्रिणीला तिच्याच बॉयफ्रेंड असलेल्या अमेय दरेकर याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ठार मारण्याचा जो प्रयत्न करण्यात आला तो अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक आहे. यामध्ये 15 व्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर बसलेल्या गर्लफ्रेंडला तिच्याच बॉयफ्रेंडने मारहाण करत धक्का दिला आहे. त्यात ती सुदैवाने वाचली असली तरी तिचे मनके फ्रॅक्चर झाले आहेत. ज्यामध्ये डॉक्टरांच्या माहितीनुसार 30 महीने तिला रिकव्हर होण्यासाठी लागतील अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलीसांनी पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड अमेय दरेकर याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याच्या एका मित्राला पोलीसांनी जबाबासाठी बोलावले आहे.

COMMENTS