Homeताज्या बातम्यादेश

प्रवासी भारतीय देशाचे राष्ट्रदूत – पंतप्रधान मोदी

इंदोर : प्रवासी भारतीय हे भारताचे जगातील राष्ट्रदूत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते मध्यप्रदेशातील इंदोर येथे 17 व्

पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर
शंभर दिवसांच्या अजेंड्यावरील कामासाठी सज्ज व्हा
खा. शरद पवार व ठाकरेंनी एनडीएमध्ये यावे

इंदोर : प्रवासी भारतीय हे भारताचे जगातील राष्ट्रदूत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते मध्यप्रदेशातील इंदोर येथे 17 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी त्यांनी सुरक्षित जावे, प्रशिक्षित जावे या संकल्पनेवर आधारित स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले. तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव – परदेशातील भारतीय समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या संकल्पनेवर आधारित पहिल्यावहिल्या डिजिटल पीबीडी प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले. यावेळी विशेष सन्माननीय निमंत्रित असलेले गयाना सहकारी प्रजासत्ताक देशाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली, सुरिनाम प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, व्ही मुरलीधरन आणि डॉ. राजकुमार रंजन सिंह उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, चार वर्षांच्या अंतरानंतर संपूर्ण दिमाखात हा प्रवासी भारतीय दिवस साजरा होत आहे. या संमेलनातील व्यक्तिगत संवादाचे महत्त्व आणि त्यातील आनंद यांच्यावर त्यांनी भर दिला. या समारंभाला उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाचे 130 कोटी भारतीयांतर्फे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की हा कार्यक्रम भारताचे हृदयस्थान समजल्या जाणार्‍या आणि नर्मदेचे पवित्र जल, हिरवागार निसर्ग , आदिवासी संस्कृती आणि अध्यात्मिक पार्श्‍वभूमी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मध्य प्रदेश राज्यात होत आहे. नुकतेच राष्ट्रार्पण करण्यात आलेल्या ‘महा काल महा लोक’ या स्थळाचा उल्लेख करून या कार्यक्रमासाठी जमलेल्या मान्यवरांनी आणि प्रतिनिधींनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे यजमान शहर असलेल्या इंदोरबद्दल बोलताना ते म्हणाले की हे केवळ शहर नसून तो  एक टप्पा  देखील आहे. असा टप्पा जो  स्वतःच्या वारशाचे जतन करतानाच काळाच्या पुढे वाटचाल करतो. पंतप्रधानांनी या शहराची सुप्रसिद्ध खाद्य संस्कृती तसेच स्वच्छता अभियानात मिळविलेल्या यशाचा देखील उल्लेख केला.

COMMENTS