Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंबाजोगाई तालुका मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेतच

अंबाजोगाई प्रतिनिधी - पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंबाजोगाई तालुक्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. शेतकर्यांनी  थोड्या पावसावरच पेरणी उरली म

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न
LOK News 24 I लॉकडाउनला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध
कोलंबियात भूस्खलनामुळे 33 जणांचा मृत्यू

अंबाजोगाई प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत अंबाजोगाई तालुक्यात एकही मोठा पाऊस झालेला नाही. शेतकर्यांनी  थोड्या पावसावरच पेरणी उरली मात्र अजूनही अंबाजोगाई तालुका मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेतच आहे.
महाराष्ट्रात इतरत्र नद्या, नाले यांना महापूर आला आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. तर अंबाजोगाई तालुक्यात कोरडाच असून शिवारात पेरण्या झाल्या मात्र नांगरलेली ढेकळेसुद्धा अद्याप विरघळली नाहीत. पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी राजा मात्र हवालदिल झाला आहे. जुलै महिना पावसाचा म्हणून ओळखला जातो मात्र तो सुद्धा संपत आला आहे. जनावरांना हिरवा चारा अजून मिळत नाही तालुक्यात कमी पावसावरच पेरण्या उरकल्या आहेत. परंतु पावसाअभावी खरीप हंगामच वाया जातो की काय अशी शंका शेतकर्यात आहे.

गेली दोन दिवसांपासून आकाशात काळेकुट्ट ढग येत आहेत. परंतु पाऊस मात्र येत नाही. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु रोज घोर निराशा होत आहे. दिवसभर भुरभुर असा पाऊस होत आहे. त्या पावसाने साधे ढेकळेही विरघळत नाहीत. तर चार तास फिरले तरी ही संपूर्ण अंग भिजत नाही, असा पाऊस तालुक्यात आहे. सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. ग्रामीण भागात वयस्कर मंडळी तरुणपुकाचा पाऊस होईल, या अपेक्षेवर बसला होता. आता म्हातारापुक आलेला आहे तरी पाऊस नाही मग पुढचे मघा नक्षत्र असून ढगाकडे बघा अशी म्हणण्याची वेळ येते का? या चिंतेने शेतकरी वर्ग ग्रासला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील पंचगंगा, कृष्णा, कोयना या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पात्राच्या बाहेर पाणी पडल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर अंबाजोगाई तालुक्यातील तलाव, नद्या, विहिरी छोटे मोठ़े प्रकल्प अद्याप कोरडे आहेत.

COMMENTS