Homeताज्या बातम्याविदेश

कर्मचारी कपातीवरुन अ‍ॅमेझानला घेरले

कर्मचारी तब्बल 40 देशात निदर्शने करणार

न्यूयार्क वृत्तसंस्था - जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसत असतांनाच, विविध कंपन्यांनी आपल्य

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक राज्यात प्रथम
गुन्हेगारीचे ‘हब’  !
राज ठाकरे यांचे शिवसेनेचे आव्हान

न्यूयार्क वृत्तसंस्था – जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्के बसत असतांनाच, विविध कंपन्यांनी आपल्या कंपन्यामध्ये नोकर कपात करण्यास सुरुवात केली आहे. नोकरकपातीवरुन अ‍ॅमेझॉनच्या कर्मचार्‍यांनी बंड पुकारले आहे. जगातील 40 देशांमधील कंपनीच्या विविध ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याची तयारी केली असून, मालक जेफ बेजोस यांच्या घराबाहेरही निर्दशर्ने करण्यात येणार आहेत.  
जागतिक पातळीवरील ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझाँनचे कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. चांगला पगार आणि चांगल्या कामाच्या परिस्थितीची मागणी त्यांनी केली आहे. हे सर्व कर्मचारी ब्लॅक फ्रायडे सेलच्या दिवशी संप पुकारणार आहेत. कारण अ‍ॅमेझॉनसाठी हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. कर्मचार्‍यांच्या या संपामुळे ग्राहकांना वेळेत वस्तूंची डिलिव्हरी देण्यात अडचणी येऊ शकतात. भारतातही विविध ठिकाणी प्रदर्शने करण्यात येणार आहेत. अ‍ॅमेझॉनच्या वेअरहाऊस विभागात काम करणार्‍या हजारो कर्मचार्‍यांनी वर्षभरातील सर्वात महत्त्वाच्या याच दिवशी ही योजना आखली आहे. अ‍ॅमेझॉनने कर्मचार्‍यांची जबरदस्तीने कपात केल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे असून या दिवशी ते वॉकआऊट करणार आहेत. अमेरिकासह, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि संपूर्ण युरोपात कर्मचारी चांगल्या कामाची स्थिती आणि पगाराची मागणी करत आहेत.

COMMENTS