Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंमली पदार्थ माफिया ललित पाटीलला पोलिसांनी केली अटक

ड्रग्ज माफिया ललित पाटील ला काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकण भागातून ड्रग्ज तस्करी करताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा काराग

चकलांबा पोलीस ठाणे यांच्या वतीने ईद आणि सणासुदी निमित्त पोलिस कर्मचार्‍यांचे रूट मार्च
 बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगेवर नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू
पाचशे डुक्कर पकडणार्‍या त्या अधिकारीवर कारवाई व्हावी

ड्रग्ज माफिया ललित पाटील ला काही दिवसांपूर्वी पुण्यातील चाकण भागातून ड्रग्ज तस्करी करताना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात झाली. तेथून त्याने कारागृहातील कमर्चाऱ्यांच्या साहाय्याने पोटाचा विकार असल्याचा बनाव रचून ससून रुग्णालयात तीन महिन्यांपूर्वी दाखल झाला असून तो तेथून ड्रग्जचे रॅकेट हाताळायचा. पोलिसांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून दोन कोटींचे अम्लीय पदार्थासह रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आणले .तो रुग्णालयातून पसार झाला असून त्याला शोधण्यासाठी मुंबई व नाशिक पोलिसांची  दहा पथके माघारी होते. त्याला चैन्नईतून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज माफिया ललित पाटीलला चैन्नईतून अटक केली आहे. पोलिसांनी त्याला पुण्यात आणले असून न्यायालयापुढे हजर करणार आहे. आरोपी ललितला रुग्णालयात सर्व सुविधांचा पुरवठा केला जात होता. त्याला या सुविधा कोण पुरवत होता तसेच या ड्रग्ज रॅकेट मागे कोणाचा हात आहे ?तो तेथून ड्रग्सचे रॅकेट कसे चालवायचा या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS