Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहीण योजनेसाठी चक्क 6 भावांचे अर्ज

त्या सहा जणांचे आधारकार्ड केले निलंबित

मुंबई ः राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करत महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये देण्याचा धाडसी निर्णय घेतला. या योजनेमुळे आत्तापर

सुशीलामाई काळे महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन
पुण्यात इंजिनिअर तरूणीची गोळ्या झाडून हत्या
कामे व्यवस्थीत करा अन्यथा कार्यक्रम : निशिकांत पाटील

मुंबई ः राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करत महिलांना दरमहिन्याला दीड हजार रूपये देण्याचा धाडसी निर्णय घेतला. या योजनेमुळे आत्तापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला असून थेट त्यांच्या बँक खात्यात ही लाभाची रक्कम जमा झाली आहे. अकोल्यात लाडकी बहीण योजनेसाठी 6 भावांनी अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे. या 6 जणांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा केल्याचे तपासात आढळले आहे. या सहा जणांवर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी माहिती दिली. तसेच, या घटनेतील 6 लाडक्या भावांवर कारवाई करत त्यांचे आधारकार्ड निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.  


अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहा जणांनी चक्क ’नारीशक्ती दूत’ अ‍ॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरला. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आली. यात या सहा पुरुषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. या सहाही जणांकडून याचा खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणार्‍या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती अकोला जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी याबाबत माहिती दिली.  

COMMENTS