आघाडी सरकारच्या 4 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार : किरीट सोमय्यांचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आघाडी सरकारच्या 4 मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार : किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबई ः महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना आधीच ईडीच्या छाप्यांनी जेरीस आणले असतांना, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या 4 मंत्

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
पिंपळनेर येथे संत निळोबाराय यात्रेची जय्यत तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

मुंबई ः महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना आधीच ईडीच्या छाप्यांनी जेरीस आणले असतांना, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या 4 मंत्र्याचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशार देऊन खळबळ उडवली आहे. ते अमरावतीमध्ये माध्यमांसमोर बोलत होते. अमरावती हिंसाचारावरून टीका करतानाच ठाकरे सरकारचे 31 डिसेंबरपर्यंत 40 घोटाळे उघड करणार असल्याचा इशारा दिला. तसेच आतापर्यंत 28 घोटाळे समोर आणले आहेत. पुढील काही दिवसात 4 मंत्र्यांचे घोटाळे उघड करू, असंही त्यांनी सांगितलं. किरीट सोमय्या म्हणाले, आम्ही 31 डिसेंबरपर्यंत 40 घोटाळे लोकांसमोर आणलेले असतील. आतापर्यंत 28 घोटाळे बाहेर काढलेत. पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारचे 4 मंत्र्यांचा समावेश असेल. त्यांच्याबाबत वेगवेगळे तपास संस्थांना मी तक्रारी केल्या आहेत. या 4 नेत्यांमध्ये 2 शिवसेनेचे आहे. हे 2 जण मुख्यमंत्र्यांच्या मित्रपरिवाराचे महत्त्वाचे सदस्य आहेत. यात काँग्रेसच्या विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. त्याची फाईल पण आलीय. सर्व तपास यंत्रणांना कागदपत्र आणि तक्रारी पाठवल्या आहेत. चौथे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, असंही सोमय्या यांनी नमूद केलं. उद्या मी जालन्याला जाणार आहे. अर्जून खोतकर यांचा साखर कारखाना घोटाळा बाहेर आलाय. उद्या त्यांनी केलेला एपीएमसी मार्केट घोटाळा समोर आणू. दोन्हीत शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपये लुटले. त्याची माहिती जनतेला देणार आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होत. या भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर 6 जणांचे फटाके फोडणार आहे. यात 3 मंत्री आणि 3 जावई असल्याचं मत किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं होतं. त्यांनी लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही सोमय्यांनी दावा केला होता. ठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

COMMENTS