Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामसभेचे ठराव डावलल्याचा आरोप

वरूर बु. ग्रामपंचायतीविरोधात उपोषण शेवगाव : तालुक्यातील वरूर बु. ग्रामपंचायतीत ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावांचे उल्लंघन करून विकासकामे रखडवली जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. पंचायत समिती कार्यालय, शेवगाव येथे दि. २४ जानेवारी पासून हे उपोषण सुरू करण्यात आले असून  काकासाहेब (प्रविण) म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले आहेत. उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार ग्रामसभेत ई-निविदा (ऑनलाईन टेंडर) प्रक्रियेद्वारे विकासकामे करण्याचा ठराव झालेला असताना, त्या ठरावाचे उल्लंघन करून कामे न करता ती जाणीवपूर्वक रखडवण्यात आली आहेत. त्यामुळे विविध योजनांतील विकासकामे तातडीने ई-निविदा प्रक्रियेद्वारे सुरू करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.  तसेच मंजूर कामांचा निधी जाणीवपूर्वक अखर्चित ठेवणाऱ्या ग्रामपंचायत निविदा समितीवर कारवाई करावी, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत वरूर बु. येथील दप्तर चौकशीचा अंतिम अहवाल सादर करून दोषींवर पंचायत समिती स्तरावरील सर्व कारवाई तात्काळ पूर्ण करावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.  पाणीपट्टी, घरपट्टी व इतर करांच्या वसुलीबाबत तसेच जमाखर्च ताळमेळासह चौकशीतील इतर सर्व मुद्द्यांवर अहवालात स्पष्टता नोंदवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दप्तर तपासणी अर्जातील सर्व टेंडर फाईल्स तपासून नियमबाह्य टेंडरवर वसुली (रिकव्हरी)ची कारवाई करावी, तसेच चौकशीदरम्यान फरार करण्यात आलेल्या अभिलेखांबाबत दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अंतिम चौकशी अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
शेवगामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दीर्घायुष्यासाठी सामूहिक प्रार्थना
विद्यार्थ्यांमधील कलारूपी राजहंस शिक्षकांनी शोधावा : प्रा. चव्हाण

वरूर बु. ग्रामपंचायतीविरोधात उपोषण

शेवगाव : तालुक्यातील वरूर बु. ग्रामपंचायतीत ग्रामसभेने मंजूर केलेल्या ठरावांचे उल्लंघन करून विकासकामे रखडवली जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली. पंचायत समिती कार्यालय, शेवगाव येथे दि. २४ जानेवारी पासून हे उपोषण सुरू करण्यात आले असून  काकासाहेब (प्रविण) म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले आहेत.

उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार ग्रामसभेत ई-निविदा (ऑनलाईन टेंडर) प्रक्रियेद्वारे विकासकामे करण्याचा ठराव झालेला असताना, त्या ठरावाचे उल्लंघन करून कामे न करता ती जाणीवपूर्वक रखडवण्यात आली आहेत. त्यामुळे विविध योजनांतील विकासकामे तातडीने ई-निविदा प्रक्रियेद्वारे सुरू करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

 तसेच मंजूर कामांचा निधी जाणीवपूर्वक अखर्चित ठेवणाऱ्या ग्रामपंचायत निविदा समितीवर कारवाई करावी, अशीही मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. ग्रामपंचायत वरूर बु. येथील दप्तर चौकशीचा अंतिम अहवाल सादर करून दोषींवर पंचायत समिती स्तरावरील सर्व कारवाई तात्काळ पूर्ण करावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

 पाणीपट्टी, घरपट्टी व इतर करांच्या वसुलीबाबत तसेच जमाखर्च ताळमेळासह चौकशीतील इतर सर्व मुद्द्यांवर अहवालात स्पष्टता नोंदवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दप्तर तपासणी अर्जातील सर्व टेंडर फाईल्स तपासून नियमबाह्य टेंडरवर वसुली (रिकव्हरी)ची कारवाई करावी, तसेच चौकशीदरम्यान फरार करण्यात आलेल्या अभिलेखांबाबत दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

अंतिम चौकशी अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS