Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर-शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने

अहमदनगर : कामिका एकादशी निमित्ताने 31 जुलै, 2024 रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर, नेवासा येथे पैस खांबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्

ग्रामीण रुग्णालयाची ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी
काँग्रेस सेवा दला तर्फे पिंप्री जलसेनमध्ये गोरगरिबांना साखर वाटप
वंचितां समवेत भोजन करून पोलिस अधीक्षकांचे काम सुरू

अहमदनगर : कामिका एकादशी निमित्ताने 31 जुलै, 2024 रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर, नेवासा येथे पैस खांबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन श्रीरामपूर-शेवगाव रोडवरील सर्व प्रकारची वाहतुक 30 जुलै रोजी रात्री 10-00 ते 31 जुलै, 2024 रोजी रात्री 11.59 मि. पर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. नेवासा फाटा ते श्रीरामपूरकडे जाणारी वाहने नेवासा फाटा-प्रवरासंगम-सिद्धेश्‍वर मंदिर-वाशिम टोका- गोधेगाव-भालगाव-नेवासा बु.-टाकळीभान-श्रीरामपुर या मार्गाने जातील. श्रीरामपुर ते नेवासा फाटा ते शेवगावकडे  जाणारी वाहने श्रीरामपुर-टाकळीभान-नेवासा बु.-भालगाव-गोधेगाव-वाशिम टोका-सिद्धेश्‍वर मंदिर-प्रवरासंगम-नेवासा फाटा-शेवगाव या मार्गे जातील. हा आदेश शासकीय वाहने, रुग्णवाहिका अग्निशामक दल व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कर्जत राशीनमार्गे जाणारी जड वाहतूक पर्यायी मार्गाने
संत श्री गोदड महाराज यात्रा उत्सव 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. या उत्सवादरम्यान कर्जत शहरामध्ये वाहतुक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन कर्जत राशीनमार्गे जाणारी जड वाहतुक 31 जुलै रोजी सकाळी 6-00 ते   1 ऑगस्ट, 2024 रोजी रात्री 11-00 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. मिरजगाव-कर्जत राशीनमार्गे जाणारी जड वाहने मिरजगाव-चिंचोली फाटा-वालवड-रेहकुरी-नांदगाव-कुळधरण-पिंपळवाडी-सोनाळवाडी-राशीन या मार्गाने जातील. हा आदेश शासकीय वाहने, रुग्णवाहिका अग्निशामक दल व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS