Homeताज्या बातम्यादेश

जगन्नाथ पुरी मंदिराचे चारही दरवाजे उघडले

भुवनेश्‍वर ः ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे गुरुवारी (13 जून) मंगला आरतीवेळी भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी राज्याचे नवे मुख

स्त्रियांनी योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास निरोगी आयुष्य जगणे शक्य : डॉ. शीतल येवले
शेतीमध्ये सेंद्रीय खतांचे प्रमाण वाढवणे गरजेचे ः डॉ. दुरगुडे
गॅस गळतीमुळे सिलेंडर चा स्फोट .

भुवनेश्‍वर ः ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे गुरुवारी (13 जून) मंगला आरतीवेळी भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी त्यांच्या मंत्रिमंडळासह पुरीचे खासदार संबित पात्रा आणि बालासोरचे खासदार प्रताप चंद्र सारंगी उपस्थित होते. दरवाजे उघडल्यानंतर सर्वांनी मंदिराची प्रदक्षिणा केली. मुख्यमंत्री माझी यांनी सांगितले की, आम्ही पहिल्या कॅबिनेट बैठकीत जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन गुरूवारी सकाळी साडेसहा वाजता सर्व दरवाजे उघडण्यात आले. मंदिराच्या विकासासाठी 500 कोटी रुपयांचा निधीही जाहीर करण्यात आला आहे.

COMMENTS