Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदुत्ववादी सरकार सत्तेत असल्याने सर्व समाज सुरक्षित : स्वामी गोविंद देवगिरी महाराज

पुणे :निवडणुकीत हिंदू विरोधी वातावरण निर्माण करणार्‍यांपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. ज्यांनी राम मंदिर आणले त्यांना मतदान करावे असे मी सूच

लेखक प्रदीप कुलकर्णी यांना प्रतिलिपी चा फेलोशिप अवॉर्ड प्राप्त
आंदोलनातून कोरोनाचे संकट पोचविणे हे नेतृत्वाचे लक्षण नव्हे ; मुख्यमंत्री ठाकरे यांची भाजपवर घणाघाती टीका
बाप रे… डेंग्यूचा कहर…’या’ राज्याची चिंता वाढली

पुणे :निवडणुकीत हिंदू विरोधी वातावरण निर्माण करणार्‍यांपासून नागरिकांनी सावध राहिले पाहिजे. ज्यांनी राम मंदिर आणले त्यांना मतदान करावे असे मी सूचित करतो. हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहे म्हणून सर्व समाज सुरक्षित आहे. हिंदू हा स्वतंत्र संप्रदाय नाही तो सर्वसमावेशक आहे. हिंदुत्व आणि मानवता हे समानार्थी वाक्य आहे. सरकार राज्यात कोणाचे येऊ दे पण त्यांनी हिंदू समाज विरोधात वागू नये. व्होट जिहाद करताना आपण प्रतिकार करणार आहे की नाही, स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे त्यामुळे व्होट धर्मयुद्ध आवश्यक आहे. आमच्यावर लादण्यात आलेल्या धर्म युद्धास आम्ही प्रतिकार करत आहे, अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज आणि राज्यातील संतांचे शिष्टमंडळ यांनी रविवारी पुण्यातील पत्रकार भवन येथे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

COMMENTS