कोल्हापूर / प्रतिनिधी : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात

कोल्हापूर / प्रतिनिधी : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकर्यांचा मृत्यू झाला होता. यातील वारकरी जठारवाडी (ता. करवीर) येथून पंढरपूरला कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पायी निघाले होते. काल (सोमवार) सायंकाळी सांगोला नजीक जुणोनी बायपासजवळ हा अपघात झाला होता. या वृत्ताने जठारवाडीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांवर आज अत्यसंस्कार करण्यात आले.
यातील सर्जेराव श्रीपती जाधव (वय 52), शारदा आनंदा घोडके (61), रंजना बळवंत जाधव (55), सुनीता सुभाष काटे (50), शांताबाई जयसिंग जाधव (62) या 5 जणांवर मंगळवारी सकाळी 8 वाजता जठारवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह सकाळी गावात येताच गावासह परिसरातल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS