Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंगर उतारावर राहणार्‍यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीच खबदारीचा इशारा

मुंबई - मुंबईत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे दरवर्षी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलन होण्याच्या घटना घडत असतात. या घटना यावर्षी घडू नये त्यासा

मुंबईकरांच्या मालमत्ता करात होणार वाढ?
पावसाळ्यातील पूरस्थितीच्या आव्हानासाठी सज्ज रहावे; पालिका आयुक्तांचे निर्देश
मुंबईतील शाळकरी मुलं मधुमेह आणि रक्तदाबाच्या विळख्यात

मुंबई – मुंबईत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे दरवर्षी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलन होण्याच्या घटना घडत असतात. या घटना यावर्षी घडू नये त्यासाठी मुंबई महानगर पालिका अलर्ट मोडवर आली आहे. पावसाळ्यापूर्वीच बीएमसीकडून डोंगर उतारावर राहणार्‍या नागरिकांना सतर्कतेचा आणि स्थलांतरीत होण्याचा इशारा दिला आहे. एस विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

विक्रोळी पश्‍चिम परिसरातील सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्‍चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग 1 आणि 2, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन मार्ग, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा मार्ग, खदान विश्‍वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडीच्या आणि डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना प्रशासनाकडून स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळ्यादरम्यान मुंबईत मुसळधार पावसाने दरडी कोसळण्याची, पावसामुळे डोंगरावरुन वाहत येणार्‍या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होण्याची शक्यता असते. तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपड्या वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडू शकतात. याचपार्श्‍वभूमीवर बीएमसी अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे बीएमसीकडून आधीच नागरिकांना सूचना देत स्थलांतरीत होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागातील धोकादायक इमारतींना आणि झोपड्यांना एस विभाग कार्यालयातर्फे सावधानतेच्या सूचना आणि नोटीस आधीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधित परिसरातील स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS