17 वर्षांनी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं रिलीज.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

17 वर्षांनी अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं रिलीज.

केमिस्ट्रीने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) यांनी 'ऐतराज' आणि 'मुझसे शादी करोगी' सारख्या हिट चित्रपटांम

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचे ट्रेलर ‘या’ तारखेला होणार रिलीज…
अक्षय कुमार आणि रवीना टंडन अवॉर्ड फंक्शनमध्ये एकत्र
अक्षय कुमार केदारनाथ बाबाच्या चरणी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) यांनी ‘ऐतराज’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र अनेक वर्षांपासून ही जोडी एकत्र दिसलेली नाहीये. अशातच त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राचं गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे 2005 मध्ये शूट झालेलं हे गाणं तब्बल 17 वर्षांनंतर रिलीज झालं आहे. ‘वो पहली बरसात’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे. गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून या गाण्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे

COMMENTS