xr:d:DAF1XU2IAWM:54,j:8318560495602170102,t:23121118 बीड । प्रतिनिधीपत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखाली दाखल झालेल्या प्रकरणात

बीड । प्रतिनिधी
पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर आरोपाखाली दाखल झालेल्या प्रकरणात बीड येथील मा. 8 वे दिवाणी न्यायाधीश तथा मुख्य न्यायदंडाधिकारी मा. व्ही. एस. यादव यांनी आरोपी अक्षय शाम आठवले यांची दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादी प्रतिक्षा अक्षय आठवले यांनी पोलिस ठाणे शिवाजीनगर, बीड येथे दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते की, दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी सुमारे 4 वाजता त्यांचे पती अक्षय आठवले हे त्यांचा मित्र वैभव कपाळे याला घरी घेऊन आले. यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यावेळी फिर्यादीची आई सुमन मच्छिंद्र प्रधान या घरी आल्या व त्यांनी अक्षय यांना उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी तो नाकारला. त्यानंतर रात्री सुमारे 11.50 वाजता फिर्यादीने पती अक्षय यांना फिनिक्स हॉस्पिटल, बीड येथे नेले असता, हॉस्पिटलच्या बाहेर आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीचा गळा दाबल्याचा तसेच रिव्हॉल्व्हर काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर घाबरून फिर्यादीने पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिस ठाणे शिवाजीनगर, बीड येथे गुन्हा रजिस्टर नं. 540/2024 अन्वये कलम 115(2), 352, 351(3) भारतीय न्याय संहिता 2023 तसेच 3/25 भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल होऊन प्रकरणास आर.सी.सी. नं. 354/2025 असा क्रमांक देण्यात आला. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. मात्र आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असा ठोस व विश्वासार्ह पुरावा सादर होऊ शकला नाही. बचाव पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत मा. न्यायालयाने आरोपी अक्षय शाम आठवले यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. ए. एम. चंदनशिव यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना अॅड. शाम हावळे, अॅड. रमेश उजगरे, अॅड. योगेश पवार व अॅड. प्राजक्ता डोंगरे यांनी सहकार्य केले.

COMMENTS