अहिल्यानगर : दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी देशभर साजरा होणारा रेडिओ किसान दिवस आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकाशवाणी आणि शेतकरी बांधवांचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच ‘किसानवाणी’ आणि ‘आमचं शेत आमचा परिसर’ या कृषी विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. उमेश पाटील, जिल्हा परिषद अहिल्यानगरचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, कृषी विज्ञान केंद्र दहिगावचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक, एनडीडीबी डेअरी सर्विसेस राहुरी सिमेन्स स्टेशनचे महाव्यवस्थापक डॉ. सरोज वहाने, प्रकाश पाटील, सुधीर लंके, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी “रेडिओ हा शेतकऱ्याचा मित्र, मार्गदर्शक आणि आवाज आहे. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध” असे मत व्यक्त केले. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र शेतकरी बांधवांसाठी सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक ९० प्रगतशील शेतकरी बांधवांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या ‘किसानवाणी’ व ‘आमचं शेत आमचा परिसर’ या कार्यक्रमांतून तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव आणि स्थानिक भाषेत दिलेले सल्ले यामुळे शेतकरी आणि शासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाल्याचेही सांगण्यात आले.कार्यक्रमास वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष साबळे, पांडुरंग जोशी, जयंत लाटे, संतोष मते, सोमनाथ कांडके, अंकुश जोशी, रेखा शेटे, शीतल ठोंबरे, अक्षता अन्नदाते, गौरव वने, ज्ञानेश्वर राऊत, रवींद्र दातीर, किरण जाधव, विष्णू रच्चा आदी उपस्थित होते.

अहिल्यानगर : दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी देशभर साजरा होणारा रेडिओ किसान दिवस आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकाशवाणी आणि शेतकरी बांधवांचे नाते अधिक दृढ व्हावे, तसेच ‘किसानवाणी’ आणि ‘आमचं शेत आमचा परिसर’ या कृषी विशेष कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ. उमेश पाटील, जिल्हा परिषद अहिल्यानगरचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, कृषी विज्ञान केंद्र दहिगावचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक, एनडीडीबी डेअरी सर्विसेस राहुरी सिमेन्स स्टेशनचे महाव्यवस्थापक डॉ. सरोज वहाने, प्रकाश पाटील, सुधीर लंके, आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी “रेडिओ हा शेतकऱ्याचा मित्र, मार्गदर्शक आणि आवाज आहे. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध” असे मत व्यक्त केले. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र शेतकरी बांधवांसाठी सातत्याने कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक ९० प्रगतशील शेतकरी बांधवांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या ‘किसानवाणी’ व ‘आमचं शेत आमचा परिसर’ या कार्यक्रमांतून तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव आणि स्थानिक भाषेत दिलेले सल्ले यामुळे शेतकरी आणि शासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत झाल्याचेही सांगण्यात आले.कार्यक्रमास वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष साबळे, पांडुरंग जोशी, जयंत लाटे, संतोष मते, सोमनाथ कांडके, अंकुश जोशी, रेखा शेटे, शीतल ठोंबरे, अक्षता अन्नदाते, गौरव वने, ज्ञानेश्वर राऊत, रवींद्र दातीर, किरण जाधव, विष्णू रच्चा आदी उपस्थित होते.

COMMENTS