Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार यांचा पाठिंबा आजच्या शिबिराला आहे – महेश तपासे 

कल्याण प्रतिनिधी - आज मुंबई विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर,  घाटकोपर या ठिकाणी होणार आहे. या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राज्यात अतिवृष्टीचा इशारा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका डबल ढोलकी प्रमाणे – राम कुलकर्णी 
तनपुरे पिता-पुत्रांचे कारखाना बंद पाडण्याचे पाप

कल्याण प्रतिनिधी – आज मुंबई विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिबिर,  घाटकोपर या ठिकाणी होणार आहे. या शिबिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, त्याच बरोबर  प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व इतर मान्यवर मंडळी  उपस्थित राहणार आहे. मात्र या शिबिराला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित राहू शकत नाही.  कारण पुण्याच्या एका मोठ्या वृत्त संस्थेचा कार्यक्रम याआधीच ठरल्या कारणा  मुळे ते या कार्यक्रमांमध्ये गैरहजर राहिल्याने अजितदादा नाराज असण्याची चर्चा होऊ नये. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी अजित पवार  का येणार नाही,  याचा खुलासा देत अजित पवार  नाराज आहे,   त्यामुळे या कार्यक्रमाला येणार नाहीत. या बातम्या अतिशय चुकीच्या आहेत.  अजित पवार  यांचा पाठिंबा आजच्या शिबिराला आहे, तर यामुळे कार्यकर्त्यांनी कुठल्याच अफवावरती विश्वास ठेवू नये.  पूर्वनियोजन कार्यक्रम असल्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही.  भविष्यात  पुढील कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. असे वक्तव्य महेश तपासे यांनी केले.  

COMMENTS