Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांना काका शरद पवारांनी दिली छोबीपछाड

मुंबई : राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत बारामती झाली. काकाविरूद्ध पुतण्या, नणंद विरूद्ध भावजय असा सामना बारामतीमध्ये रंगला होता. प्रचंड दमबाजी, मीच

राजीनामा मागे घेण्याचे संकेत ?
शरद पवारांना नागालँडमध्येही धक्का
शरद पवारांना धमकी देणारा अटकेत

मुंबई : राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत बारामती झाली. काकाविरूद्ध पुतण्या, नणंद विरूद्ध भावजय असा सामना बारामतीमध्ये रंगला होता. प्रचंड दमबाजी, मीच कामचा माणूस आहे, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली होती. मात्र बारामतीकरांनी मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना पसंती दिली आहे तर सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना नाकारलं. राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे. त्यामुळे बारामतीच्या अतितटीच्या लढाईत काकांनी पुतण्याला धोबीपछाड देत आपणच बारामतीचे ’बॉस’ असल्याचा सिद्ध केले. बारामतीतील पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार याच्यामध्ये चढाओढ सुरू असल्याचे दिसून आले. पण शेवटच्या टप्प्यात सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे गेल्या 60 वर्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शरद पवारांनी आपल्या लेकीला निवडून आणत बारामती आपलीच आहे हा संदेश दिला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांचा पहिला सामना झाला तो त्यांच्या होमग्राऊंडवर, बारामतीमध्ये. अजित पवारांनी शरद पवारांशी थेट पंगा घेत, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीच उमेदवारी जाहीर केली. अजित पवारांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनीही विरोध करत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला. बारामतीमध्ये पवारांना घेरण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. जे जे नेते अजित पवारांच्या विरोधात होते, त्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे वळवून घेतले आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय केले. हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. त्याचवेळी स्थानिक पातळीवरील अनेक नेत्याना अजित अजित पवारांनी साम, दाम, दंड, भेद नितीने आपल्या बाजूने वळवून घेतले. तर दुसर्‍या बाजूला शरद पवार बारामतीमध्ये सक्रिय होऊन जुन्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यामध्ये त्यांनी अनंतराव थोपटे आणि चंद्रराव तावरे यांची भेट घेऊन राजकीय बेरीज केली. तसेच गावागावातल्या अनेक स्थानिक संस्थांच्या पदाधिकांच्या भेटी घेतल्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाणं पसंत केले, त्याचवेळी शरद पवारांचे अनेक विश्‍वासू नेते फोडून राष्ट्रवादीवर दावाही केला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजितदादांना दिल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षसंघटना उभी केली. तुतारी या चिन्हासह ते लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेले, आणि सुप्रिया सुळे विजयी झाल्या. त्यामुळे अजित पवारांच्या राजकारणावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतांना दिसून येत आहे.

COMMENTS