मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघत असतांनाच, विरोधी पक्षनेते अजित पवार अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँगे्रसम
मुंबई/प्रतिनिधी ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघत असतांनाच, विरोधी पक्षनेते अजित पवार अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकते, असा दावा शुक्रवारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण होईल, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवार नाराज आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटण्याची चर्चा आहे. हाच प्रश्न पत्रकारांनी दादा भुसे यांना विचारला असता ते म्हणाले की, अजित पवार अस्वस्थ आहेत. हे तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत आहोत. मग काही पण होऊ शकते, असा दावा करायलाही ते विसरले नाहीत. शिंदे गटाच्या 48 पैकी 40 जागा जिंकू असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भुसे म्हणाले की, संजय राऊतांना स्वप्न पाहयाला बंदी नाही. त्यांनी अशी स्वप्ने बघत रहावीत, त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असा टोला त्यांनी हाणला. गेल्या दोन दिवसांपूर्वीही अजित पवार नॉट रिचेबल होते. त्यामुळे अनेक वावड्या उठल्या. शेवटी अजित पवारांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगत माध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर दादा भुसे म्हणाले की, हा सारा बालिशपणा आहे. त्यांनी हे तेव्हाच बोलायला हवे होते. ही राहुल गांधी यांची स्टाइल असल्याचा आरोप ही त्यांनी केला.
COMMENTS