Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वेटरचे काम करत बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अजिंक्य मस्के मातृभूमी कडून सन्मानित

बीड प्रतिनिधी - राज्यभरात इयत्ता बारावीचा निकाल दिनांक 25 मे 2023 रोजी नुकताच जाहीर झाला असून अजिंक्य दिनकर मस्के याने  नगर रोड वरील जुनी पंचायत

मुंबईत ‘भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ होणार : मंत्री उदय सामंत यांची घोषणा
यशश्रीच्या हत्येप्रकरणी दाऊद शेखच्या आवळल्या मुसक्या
धोत्रा येथे सिलबंद शासकीय पोषण आहारात निघाला भलामोठा उंदीर

बीड प्रतिनिधी – राज्यभरात इयत्ता बारावीचा निकाल दिनांक 25 मे 2023 रोजी नुकताच जाहीर झाला असून अजिंक्य दिनकर मस्के याने  नगर रोड वरील जुनी पंचायत समिती समोरील ,लक्ष्मी शाकाहारी हॉटेलमध्ये पार्ट टाइम वेटरचे काम करत इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत 80 टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन करून सौ.के.एस.के .महाविद्यालयातून प्रथम आल्याबद्दल मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे व प्रा.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिनांक 29 मे 2023 रोजी लक्ष्मी हॉटेलमध्ये त्याचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अजिंक्य मस्के म्हणाला की ,मी यानंतर पुण्याला जाऊन सी.ए .चे शिक्षण घेणार आहे .यावेळी शशिकांत रसाळ, वैजयंता विद्याघर, नवनाथ राव शेंडगे, मनोज मुळी ,अमोल भंडा ने आदी उपस्थित होते

COMMENTS