Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजय बारस्करांची कार पंढरपूरमध्ये जाळली

सोलापूर :  मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांना विरोध करणार्‍या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाली आहे. बारस्कर यांना

जळगावमध्ये आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’चा रुग्ण
अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.

सोलापूर :  मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांना विरोध करणार्‍या अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळाली आहे. बारस्कर यांना दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने गाडी जळाली की जाळली याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांना विरोध करणारे त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांची कार आषाढी एकादशीच्या पहाटे जळाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरला आलेल्या अजय महाराज याना सातत्याने धमक्या मिळत असल्याचा व्हिडीओ महाराज यांनी फेसबुक वर करून व्हायरल केला होता. यानंतर बारस्कर यांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आपली टोयाटो कंपनीची कार भाविकांच्या निवासासाठी उभारलेल्या 65 एकर येथील भक्तिसागर येथे पार्क केली होती. अजय महाराज बारस्कर स्नान आणि प्रदक्षिणेसाठी गेले होते. यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली.  यानंतर तातडीने अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे. यामुळे 1 लाखाचे नुकसान झाल्याचेही बारस्कर यांनी तक्रारीत सांगितले आहे. यातच त्यांना जरांगे समर्थकांनी केलेला धमकीचा एक फोन देखील व्हायरल झाला आहे. यात थेट बारस्कर याना शिवीगाळ आणि धमकी हा समर्थक देत असल्याचे दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या बारस्कर यांची गाडी जळाल्याने  उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून पोलीस आता या परिसरात असणार्‍या सीसी टीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करीत आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काही महिन्यांपूर्वी अजय महाराज बारस्कर चर्चेत आले होते.

COMMENTS