नवी दिल्ली ः एअर इंडियाच्या विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरण सोशल मीडिया असेल किंवा प्रसारमाध्यमं असतील सगळीकडेच गाजलं हो

नवी दिल्ली ः एअर इंडियाच्या विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरण सोशल मीडिया असेल किंवा प्रसारमाध्यमं असतील सगळीकडेच गाजलं होतं. या प्रकरणात आता वाहतूक महासंचनलायाने एअर इंडियाला 30 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढंच नाही तर या विमानाच्या वैमिनिकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे.
नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी एअर इंडियाला हा दंड ठोठावला आहे. विमानतल्या वैमानिकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही हा ठपका ठेवत त्याला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसंच या विमानाच्या डायरेक्टरला तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यासाठी शंकर मिश्राला चार महिन्यांची बंदीही घालण्यात आली आहे.
COMMENTS