Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भारताला सक्षम बनविण्याचे लक्ष्य : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आपल्यामधले जे लोक ग्रामीण भागात जन्मले आणि वाढले आहेत त्यांना गावांमधले सामर्थ्य माहिती आहे. गावात राहणार्‍या लोकांमध्ये गावांचा आत्

गेम चेंजर महिला नेत्या !
सिव्हील जळीतकांड तपासासाठी पोलिस बोलावणार एक्सपर्ट टीम ; तपासानंतर कलमांमध्ये होणार वाढ ?
नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन

नवी दिल्ली : आपल्यामधले जे लोक ग्रामीण भागात जन्मले आणि वाढले आहेत त्यांना गावांमधले सामर्थ्य माहिती आहे. गावात राहणार्‍या लोकांमध्ये गावांचा आत्मा आहे. गावात राहिलेल्यांना ग्रामीण जीवन कसे जगायचे हे देखील माहिती आहे. त्यामुळे आमचे सरकार ग्रामीण भारताला सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. विकसित भारत 2047 च्या दृष्टीने लवचिक ग्रामीण भारताची उभारणी ही या महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवात भाषणाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी उपस्थितांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित केलेला भव्य ग्रामीण भारत महोत्सव ही भारताच्या विकासयात्रेची झलक आहे आणि विकसित भारत निर्माणाची ओळख देखील आहे असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, बालपण एका छोट्या शहरात, साध्या वातावरणात व्यतीत झाल्याबद्दल ते स्वतःला नशीबवान समजतात. शहर सोडल्यानंतर ते बराच काळ ग्रामीण भागात राहिले. पंतप्रधान म्हणाले, मी गावातल्या अडचणी अनुभवल्या आहेत आणि ग्रामीण भागातले सामर्थ्यदेखील मला माहीत आहे. बालपणापासून मी पाहिले आहे की गावांमधले लोक भरपूर कष्ट करतात परंतु पैशांअभावी त्यांना बर्‍याच संधी गमवाव्या लागतात. ते पुढे म्हणाले की, गावातल्या लोकांकडे विविध क्षेत्रांमधले सामर्थ्य असूनही त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यामध्ये हे सामर्थ्य हरवून जाते. नैसर्गिक आपत्ती, शेतकर्‍यांना बाजारपेठ उपलब्ध नसणे अशा अनेक आव्हानांचा त्यांना सामना करावा लागतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे सगळे पाहिल्यानंतर त्यांना गावातल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करण्याचा विचार करुन मनात त्याप्रमाणे निश्‍चय केला. ते पुढे म्हणाले की गावांमधले अनुभव आणि शिकवण यामधून प्रेरणा घेत आज ग्रामीण भागात अनेक विकासकामे करण्यात येत आहेत. मोदी म्हणाले की, 2014 पासून ते सतत ग्रामीण भारताची सेवा करत आहेत. ग्रामीण भागातल्या लोकांना सन्मानाने जगायला मिळेल याची हमी देण्याला माझ्या सरकारचे प्राधान्य आहे. सक्षम ग्रामीण भारताची हमी, ग्रामस्थांसाठी पुरेशा संधी उपलब्ध करुन देणे, स्थलांतराचे प्रमाण कमी करणे आणि ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य सुलभ करणे हे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, म्हणूनच सरकारने प्रत्येक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काही योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रत्येक घरात शौचालय बांधून देण्यात आले, ग्रामीण भारतातल्या करोडो लोकांना पीएम आवास योजनेअंतर्गत पक्की घरे बांधून देण्यात आली आणि जलजीवन मिशनअंतर्गत लाखो घरांना सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी आर्थिक धोरण तयार केले
ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामीण समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करणारी आर्थिक धोरणे तयार करण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी विशद केले. गेल्या 10 वर्षांत सरकारने विशेष धोरणांची आखणी केली तसेच खेड्यातील प्रत्येक घटकासाठी निर्णय घेतले गेले याबद्दल आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळाने नुकतीच काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली तसेच डीएपी खतांवरील अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही मोदींनी सांगितले. सरकारचे उद्देश, धोरणे आणि निर्णयांमुळे ग्रामीण भारताला नवी ऊर्जा दिली जात असल्याचा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला.

COMMENTS