Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवीनगर‘

राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मान्यता

मुंबई ः राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, यामध्ये अहमदनगरचे नामकरण पुण्यश्‍लोक अहिल्यादेवीन

नांदेड घटनेत चौकशीअंती दोषींवर कारवाई
मुंबईचं प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे अ‍ॅक्शन मोडवर
ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार

मुंबई ः राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, यामध्ये अहमदनगरचे नामकरण पुण्यश्‍लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यात अहमदनगर शहराचे नामकरण हे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी नगर करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबरोबरच पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्याचे नाव राजगड करण्यास देखील राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

मुंबई उपनगरातील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यात देखील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात असताना राज्य मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पोलिस पाटलांच्या मानधनात वाढ करत त्यांचे आता दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मानवसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून याबरोबरच आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात भारीव वाढ करण्याचे आश्‍वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते. त्यानुसार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव 5000 रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य केले जाईल, महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार, शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्यासाठी 11 हजार 585 कोटींच्या प्रकल्पास मान्यता देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत राज्यात 23 हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा संकल्प केला आहे. यापैकी दहा हजार किमीपर्यंतचे रस्ते यंदाच्या वर्षात बांधले जातील, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासोबतच केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.  जम्मू काश्मीरच्या श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार आहे. यासोबतच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. 3200 कोटींचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

वेल्हे तालुका आता राजगड म्हणून ओळखला जाणार – पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका ऐतिहासिक दृष्टा महत्त्वाचा मानला जातो. याच तालुक्यामध्ये राजगड आणि तोरणा यासारखे छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे किल्ले आहेत. राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालवला होता. त्यामुळे हा स्वराज्याची पहिली राजधानी मानली जाते. त्यामुळे वेल्हे तालुक्याला राजगड हे नाव देण्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

अहिल्यादेवींचे नाव शहराला मिळणे आनंददायी ः आमदार जगताप – नगर शहराला पुण्यश्‍लोक अहिल्यानगर नाव दिल्याबद्दल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळाचे आभार मानत आहे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा जिल्ह्याला लाभलेला असून त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे त्यांचे समाजाप्रती असलेले कार्य महान आहे त्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा  पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव नगर शहराला मिळाल्याने ही बाब आनंददायी असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

COMMENTS