Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भगवान महावीर जयंतीनिमित्त उद्या अहिंसा बाईक रॅली

अहमदनगर/प्रतिनिधी : भगवान महावीर महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी 4 एप्रिल रोजी साजरा होत आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांतीचा

नेवाशातील त्या घटनेबाबत अखेर गुन्हा दाखल ; पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
गोवा बनावटीच्या दारूसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त व एकास अटक! l LokNews24
ढोकरीकर परिवाराच्या सामाजिक बांधिलकीतून कर्जतमध्ये अग्निशमन केंद्र : खा. सुप्रियाताई सुळे

अहमदनगर/प्रतिनिधी : भगवान महावीर महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सव मंगळवारी 4 एप्रिल रोजी साजरा होत आहे. भगवान महावीर यांनी जगाला शांतीचा व अहिंसेचा संदेश दिला असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरात मंगळवारी सकाळी 10.30 वाजता अहिंसा बाईक रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती सकल राजस्थानी युवा मंच यांनी दिली.

अहिंसा बाईक रॅलीला आनंदधाम येथे जैन ध्वजारोहण करून सुरुवात होणार आहे. आनंदधाम, मार्केट यार्ड, बंगाल चौकी, खिस्त गल्ली, जुना बाजार, पिंजार गल्ली, आडते बाजार, दाळमंडई, कापड बाजार, अर्बन बँक रोड, नवीपेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड, लक्ष्मी कारंजा, आसरा ट्रेडर्स, बेडेकर क्लासेस, आशा टॉकीज, पांचपीर चावडी, माळीवाडा, इम्पिरियल हॉटेल, चाणक्य चौक मार्गे आनंदधाम येथे रॅलीचा समारोप होईल.

या रॅलीत जैन ओसवाल युवक संघ, श्रीबडीसाजन ओसवाल युवक संघ, नगर तालुका माहेश्‍वरी सभा, श्रीमाहेश्‍वरी युवा संघटन, जय आनंद महावीर युवक मंडळ, जय आनंद ग्रुप, जिनगर युवा मंच, महावीर प्रतिष्ठान, महावीर चषक परिवार, जैन कॉन्फरन्स युवा संघटन, वर्धमान युवक मंडळ व सकल जैन समाज सहभागी होणार आहे.

COMMENTS