अहिल्यानगर : सरपंच परिषद व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.16 एप्रिल) शहरातील गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात
अहिल्यानगर : सरपंच परिषद व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.16 एप्रिल) शहरातील गुलमोहर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयात 96 वा मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. या वधू वर परिचय मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच परिषद कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे पाटील, मराठा सोयरीक संस्थेच्या संचालिका जयश्री अशोक कुटे व शब्दगंध साहित्यिक परिषदेचे राजेंद्र उदागे पाटील यांनी केले आहे.
मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून पुण्यातील थोरांदळेचे लोकनियुक्त आदर्श सरपंच व सरपंच परिषद कोअर कमिटीचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. टेमगिरे हे असणार आहेत
सायंकाळी 5 वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. या वधू वर परिचय मेळाव्यासाठी जगदंब फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लंघे, मराठा सोयरीकचे अध्यक्ष अशोक कुटे, नानासाहेब दानवे, प्रमोद झावरे, संपतराव सोनवणे, मधुकर निकम, अन्नपूर्णा ढम, अनिल अकोलकर, गोरक्षनाथ पटारे, संदीप जगताप, अमोल धनवडे, मोहन हेलकुटे, योगेश कोतकर, पारुनाथ ढोकळे, राजेंद्र औताडे, राजेंद्र भापकर आदी प्रयत्नशील आहेत.
97 वा मोफत वधू वर परिचय मेळावा रविवार दि.20 एप्रिल रोजी चंदननगर (पुणे) येथे व 98 वा मेळावा रविवार दि. 27 एप्रिल रोजी आळंदी येथे होणार आहे. या सर्व मेळाव्यासाठी येताना वधू- वरांनी स्वतः आधार कार्ड झेरॉक्स, बायोडाटा घेऊन पालकांसह मेळाव्यास यायचे आहे. अनेक वेगवेगळ्या तालुक्यातील व वेगवेगळ्या जिल्ह्यातील सर्व प्रकारचे स्थळे या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी 7447785910 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
या मेळाव्यामध्ये मुला-मुलींना पालकांना प्रत्यक्ष एकमेकांना बघता येते. एकमेकांच्या अपेक्षा, आवडीनिवडी समजतात. समक्ष भेट झाल्यामुळे लग्न जमण्यास मदत होते. एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलं, मुली व बायोडाटे बघायला – ऐकायला मिळतात. आज काल लग्न जमवण्यासाठी आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना देखील वेळ मिळत नसल्यामुळे कोणीही स्थळ दाखवण्यात आता मदत करत नाही. म्हणून अशा वधू वर मेळाव्यांची दिवसेंदिवस गरज पडत आहे. मराठा सोयरीक संस्थेने आतापर्यंत 95 यशस्वी वधू वर मेळावे घेतले आहेत. या संस्थेकडून आतापर्यंत 4560 लग्न पार पाडलेले आहेत. त्यापैकी 650 लग्न हे विधवा, विदुर, घटस्फोटीत यांचे लग्न लावण्यात आले आहे. धर्मादाय कार्यालयात नाव नोंदणी केलेली शासनमान्य ही संस्था असल्याची आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
COMMENTS