Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर : बाजरी, ज्वारी पिक कर्ज मर्यादेत वाढ : चेअरमन आ.कर्डिले

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये सन 2025

अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील 22 हजार शेतकर्‍यांसाठी 10 कोटी
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
लातूरातील 13 शाळा ‘पीएम-श्री’ योजनेत; अनुभवात्मक पद्धतीने मिळणार भविष्यवेधी शिक्षण

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेतले असून बँकेच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये सन 2025-26 करीता खरीप व रब्बी हंगामातील बाजरी व ज्वारी पिकासाठी पूर्वीचे रु.30 हजार रूपयांवरून एकरी कर्जदरात 10 हजार रूपये वाढ करुन या पिकांचे एकरी कर्जदर 40 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.

बँकेमार्फत आज अखेर अल्पमुदत पीककर्जा करिता २४२१ कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचेकडील दि.३१ मार्च २०२५ अखेर असलेल्या वसुलास पात्र पिक कर्ज रकमेचा वेळेत भरणा करुन शासनाच्या व्याज परतावा धोरणाचा फायदा घेवुन रु.३ लाखापर्यंतच्या पिक कर्जास शुन्य टक्के व्याजदराचा फायदा घ्यावा व बँकेचे नवीन वाढीव कर्जदाराचा लाभ घ्यावा तसेच थकबाकीदार शेतक-यांनी कर्ज भरल्यास त्यांना बँक त्वरीत पिक कर्ज देईल त्यामुळे कर्जदार शेतक-यांनी आपले कर्ज ३१ मार्च २०२५ पुर्वी बँकेत भरणा करण्याचे आवाहन चेअरमन कर्डिले यांनी केले. यासाठी बँक शेतकरी कर्जदारांचे कर्ज भरण्याकरीता दिनांक २९, ३० व ३१ मार्च २०२५ रोजी चालू राहणार असल्याची हि माहिती चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली…

COMMENTS