Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमाचा जागतिक स्तरावर गौरव

अहिल्यानगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील लोकाभिमुख व दर्जेदार मतदार जनजागृतीच्या सर्वाधिक (१६८) नावीन्यपूर्ण स्व

पत्नीने नांदायला नकार दिल्याने पतीने पत्नीवर व स्वतःवर केला चाकूने वार
जिल्हा बँकेत सुरू…श्रेयाचे भांडण
अहिल्यानगरला डिसेंबरमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

अहिल्यानगर : नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील लोकाभिमुख व दर्जेदार मतदार जनजागृतीच्या सर्वाधिक (१६८) नावीन्यपूर्ण स्वीप उपक्रमांची इंग्लंडच्या लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, तसेच सर्वाधिक स्वीप जनजागृतीच्या साहित्य संकलनाचा (१६ लाख ९४ हजार ८३७) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश झाला आहे. याशिवाय वोटींग सेल्फी पॉईंटवर सर्वाधिक सेल्फी फोटो (१४ हजार ४६५) घेण्याच्या विक्रमाचा होप इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश झाला आहे. या कामगिरीबद्दल अहिल्यानगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा इंग्लंड व अमेरिकेच्या संस्थांकडून प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, जिल्हा मतदारदूत डॉ.अमोल बागुल , निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदींनी समितीच्यावतीने या प्रमाणपत्रांचा स्वीकार केला.

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या निर्देशानुसार दोन्ही निवडणुकांमध्ये जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या सुमारे १६८ प्रकारचे नाविन्यपूर्ण गटातील उपक्रमांच्या माध्यमातून सुमारे १६ लाख ९४ हजार ८३७ एवढ्या विक्रमी संख्येने फोटो ,व्हिडिओ , ऑडिओ ,दस्तऐवज, पीडीएफ, वृत्तपत्र कात्रणे, ऑफलाइन/ऑनलाइन फाइल्स , ऑडिओ जिंगल्स , इमोजी , लिंक्स , जीआयएफ, शॉर्ट युआरएल , गुगल मीटिंग , पीपीटी सादरीकरणे व संदेश या स्वरूपात स्वीप जनजागृतीचे साहित्य प्राप्त झाले.

मिशन – ७५ मोहिमेअंतर्गत लोकशाहीचे शिल्पकार पुरस्कार, स्वीप मंडपम, विधानमंडप , मतदारनगरी, देशातील पहिलाअहिल्यानगर स्वीप केअर व्हॉट्सअप क्रमांक,आग्युमेंटेड आणि व्हर्च्युअल रियालिटी (एआर-व्हीआर), आर्टिफिशियल इंटेलिजन्स व गुगल असिस्टंटचा वापर,संकल्प पत्र, ई-मतदार शपथ, लोकशाहीचे मतस्थानक, वोटर स्टेशन, एयर डेमोक्रॉसी, डीपी बोले तो…, डेमोक्रसी पार्टीसिपेशन, लोकशाहीची शाळा, लोकशाहीचा दीपोत्सव, आमचे कुटुंब- आमची लोकशाही, डेमोक्रॉसी स्टुडिओ ,रक्षाबंधनानिमित्त क्यूआर कोड राख्यांची निर्मिती, स्वातंत्र्यदिनानिमित्त क्युआर कोडमध्ये भारतीय तिरंगा, स्वीप चॅम्पियन पुरस्कार ,मी मतदारदूत ,डी-व्हिडीओ, स्वीप टीव्ही चॅनेल ,विधान पत्रिका,विधानसभेची पूर्वपीठिका ग्रंथ ,लोकशाहीचा जागरमधील २४ प्रकारच्या स्पर्धा आदी वैशिष्ट्यपूर्ण व नावीन्यपूर्ण शेकडो उपक्रमांची दखल यानिमित्ताने घेण्यात आली आहे.

आतापर्यंत अमेरिकन मेरिट कौन्सिल, केंद्रीय संचार ब्युरो-भारत सरकार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय-महाराष्ट्र, विभागीय आयुक्त कार्यालय- नाशिक विभाग-नाशिक या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय व राज्य संस्था व कार्यालयांनी, तसेच निवडणुक आयुक्त डॉ.सुखविंदर सिंग संधू , राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, स्वीप संचालकसंतोष अजमेरा , स्वीप वरिष्ठ सल्लागारआराधना शर्मा, विशेष निवडणूक निरीक्षक श्रीराम , नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी विधानसभा निवडणूकीत भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक आदी मान्यवरांनी अहिल्यानगर जिल्हा स्वीप समितीच्या उपक्रमांचे वेळोवेळी कौतुक केले आहे.

शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अशोक कडूस , शिक्षणाधिकारी- योजना बाळासाहेब बुगे, स्वीप समिती सदस्य आदींनी या उपक्रमासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले.

COMMENTS