सहा गोळ्या झाडल्या, गंभीर जखमीजामखेड अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे एक धक्कादायक गुन्हेगारी घटना घडली आहे. कुख्यात गुंड आणि पैलवान सागर मोहोळक

सहा गोळ्या झाडल्या, गंभीर जखमी
जामखेड
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे एक धक्कादायक गुन्हेगारी घटना घडली आहे. कुख्यात गुंड आणि पैलवान सागर मोहोळकर यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी रात्री थेट गोळीबार केला. या हल्ल्यात एकापाठोपाठ सहा गोळ्या झाडण्यात आल्या असून, त्यापैकी पाच गोळ्या सागर मोहोळकर याला लागल्या आहेत.घटना मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता जामखेडच्या नुराणी कॉलनी परिसरात घडली. सागर मोहोळकर हे त्या वेळी रस्त्यावर चालत होता. अचानक समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्या लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सागर मोहोळकर याला तोंडात दोन, डोळ्याला एक आणि छातीवर दोन गोळ्या लागल्या आहेत. जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक तपास सुरू केला असून, हल्लेखोरांना शोधण्यासाठी अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.सागर मोहोळकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी चर्चेत आहे. गेल्या वर्षी (११ एप्रिल २०२५) धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत त्याने पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला कानशिलात मारहाण केली होती. त्यानंतर हा प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. सागर मोहोळकर यांच्यावर यापूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल असून, तुरुंगातही त्याने एका व्यक्तीचा खून केल्याची माहिती आहे. तो कुस्तीच्या फडासोबत गुन्हेगारी जगतात सक्रिय असल्याचे सांगितले जाते.
पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, जुना वैयक्तिक वाद किंवा गँगवारचा हा प्रकार असू शकतो. हल्लेखोर अद्याप फरार असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेने जामखेडसह परिसरातील जिल्ह्यांत खळबळ उडाली आहे.

COMMENTS