Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आहिल्यादेवी होळकर जयंतीला यात्रा काढणारच : आ रोहित पवार

आ राम शिंदे आ रोहित पवार यांच्यातील संघर्ष वाढला

जामखेड/प्रतिनिधीः अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त 31 मे रोजी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभूमीतून आलेली य

रोहित पवारांचा मंत्री पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानी चा दावा
आ. रोहित पवारांच्या माध्यमातून उद्या विकासकामांचे भूमिपूजन
रोहित पवारांचा पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

जामखेड/प्रतिनिधीः अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त 31 मे रोजी ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभूमीतून आलेली यात्रेत चौडीत सहभागी होणारच असा निश्‍चय आमदार रोहित पवार यांनी चौंडीत पत्रकार परिषदेत केला आहे.
               दरवर्षीप्रमाणे चौंडी या गावात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त पारंपरिक मिरवणुकीसाठी आणि इतर कार्यक्रमासाठी आ रोहित पवार यांनी परवानगी मागितली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारल्यानंतर आता आम्ही कसल्याही परिस्थितीत मिरवणूक काढूच असा इशारा आ रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. जयंती उत्सवानिमित्त बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून आ रोहित पवार यांना बोलावले नाही. या सोहळ्यावरून आ राम शिंदे आणि आ रोहित पवार यांचा संघर्ष टोकाला जातांना दिसत आहे.
          पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या 31 मे रोजी चौंडी (ता. जामखेड) येथे होणार्‍या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. चौडी येथील पत्रकार परिषदेला प्रा.मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, प्रा राजेंद्र पवार, सुरेश भोसले, अहिल्यादेवी होळकर, अक्षय शिंदे, सुधीर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रकाश सदाफुले, सरपंच सुनील उबाळे यांच्या सह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
यावर्षी अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कर्मभूमीतून जन्मभूमीत गजराज,घोडे, टाळकरी, वारकरी व ग्रामस्थांसमवेत यात्रा काढत काढण्यात येत आहे. यात अनेक धार्मिक कार्यक्रम राहतील नंतर सर्वाना महाप्रसाद दिला जाईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येण्याच्या अगोदर आमचा कार्यक्रम संपेल. शासकीय कार्यक्रमाला आमचा पाठिंबा आहे. मात्र आम्ही शांततेत आमचे कार्यक्रम करू काही अटि-शर्थीसह आम्हाला परवानगी द्यावी अशी विनंती आ. रोहित पवार यांनी केली मात्र सत्ताधारयांच्या दबावाखाली प्रशासनाने परवानगी नाकारली.त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी चालेल पण आम्ही जयंती यात्रेत सहभागी होणारच असे आ रोहित पवार यांनी जाहीर पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे चौडीत संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.
           गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार होते. तर भाजपा विरोधी पक्षात होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने भाजपाला परवानगी नाकारली होती. तरीही शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर गोपीचंद पडळकर व आमदार प्रा.राम शिंदे यांची जाहीर सभा झाली होती. या वर्षी  सत्ताधारी भाजपा तर विरोधात महाविकास आघाडी सरकार आहे.

COMMENTS