Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौंडीत आज अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी अभिवादन समारंभ

धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे अ‍ॅड. डांगे यांचे आवाहन

जामखेड ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे आज मंगळवारी सकाळी 10:00 वाजता अभिवादन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

Ahmednagar : नगरमध्ये खळबळ: बड्या अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या | LokNews24
वीस खेळाडूंनी पटकावले सुवर्णपदक
सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने पळवले

जामखेड ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त चौंडी येथे आज मंगळवारी सकाळी 10:00 वाजता अभिवादन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे.
या अभिवादन मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री, डॉ. अण्णासाहेब डांगे हे मार्गदर्शन करणार असून माजी मंत्री, आ. प्रा. राम शिंदे, माजी आ. अ‍ॅड. रामहरी रूपनवर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष श्रीरामभाऊ पुंडे, मल्हार सेना सरसेनापती  बबनराव रानगे, अहिंल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अलकाताई गोडे, महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनिलभाऊ वाघ, सांस्कृतीक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुण घोडके, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अंकुश निर्मळ आदी महासंघाचे प्रदेश पदाधिकारी या पुण्यतिथी समारंभास उपस्थित रहाणार आहेत. तरी महाराष्ट्रातील धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी व समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांनी केले आहे.

COMMENTS