नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कारण कृषीमंत्री कोकाटे आ

नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कारण कृषीमंत्री कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे या दोघांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा गुरूवारी सुनावल्यामुळे खळबळ उडाली आहे. या निर्णयाविरोधात कृषीमंत्री कोकाटे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करू शकतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या शिक्षेस स्थगिती न दिल्यास त्यांची आमदारकी देखील रद्द होवू शकते, त्यामुळे कृषीमंत्री कोकाटे यांचा पाय आणखी खोलात जातांना दिसून येत आहे.
कृषीमंत्री कोकाटे यांच्यावर 1995 मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे.
कोणत्या प्रकरणात शिक्षा ?
1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या आरोपांवरून हा निर्णय देण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यांसंदर्भात याचिका दाखल केली होती. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावावर भादंवि कलम 420 (फसवणूक), 465 (कृत्रिम दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवजाचा उपयोग करणे) आणि 474 (सत्यता लपवणे) या कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
COMMENTS